गोपीनाथ मुंडे पंचतत्वात विलीन
आपले सर्वांचे लाडके नेते श्री गोपीनाथजी मुंडे अखेर पंचतत्वात विलीन झाले. ज्या मातीत, आपल्या जवळच्या माणसांच्या गर्दीत त्यांचे हात उंचावून स्वागत व्हायचे होते, त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घ्यायचे, हि कल्पनाच आज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पुढे प्रश्न पडला होता. या कल्पनेनेच बेभान झालेल्या हजारोंच्या जनसमुदायाने ‘अमर रहे अमर रहे.. गोपीनाथ मुंडे अमर रहे’ अशा आर्त घोषणा देत परळीतील वैजनाथ साखर कारखान्याचा परिसर हेलावून सोडला होता. मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे (पालवे) यांनीच त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. मुंडे यांच्या अपघाती निधनाची सीबीआय चौकशी व्हावी, या मागणीचा स्वर जमावातून इतका टिपेला गेला की मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सुद्धा दगडफेक करण्यात आली होती, हर्षवर्धन पाटील, छगन भुजबळ या मंत्र्यांची अडवणूक सुरू झाल्याने हतबल पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. जमावाला आटोकाट आणण्याचा पोलिसांनी फार प्रयन्त केला पण ते त्यांना काही जमले नाही. कारण आज मुंडे आपल्यात नाही हेच त्यांना काळात नव्हते. बेभान झालेल्या जमावामुळे लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, राजनाथ सिंह हे केंद्रीय नेते अंत्यविधीला न येताच परतले.बेभान जमावामुळे सुरक्षेचे तीनतेरा झालेले होते.
सुरक्षाव्यवस्थेतील असलेल्या त्रुटींमुळे झालेली दगडफेक, आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी झालेली अलोट गर्दी आणि यामुळे एका बाजूला वडिलांचे जाण्याचे दु:ख आणि दुसऱ्या बाजूला जमावाला शांत करण्याची पराकाष्टा पंकजा मुंडे यांना करावी लागली. मुंडेंच्या अंत्यविधीला इतकी अलोट गर्दी होईल आणि ती इतकी बेभान बनेल, अशी कल्पनाच सुरक्षा यंत्रणेला न आल्याने या अंत्यविधीप्रसंगी सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आलेले आहे.
इतके मोठे नेते येणार या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले नव्हते आणि हजारो लोक अंत्यदर्शनाला लोटल्यावर त्यांना दर्शन नेमके कसे करू द्यावे, याचेही नियोजन नसल्यामुळे गर्दीला आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. म्हणून पंकजा मुंडे यांनी स्वतःला सावरून माइक हातात घेऊन लोकांना शांत राहाण्याचे आव्हाहन केले आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केल्यावर जमाव काही काळ शांत झाला. पण जेंव्हा मोठे नेते येऊ लागले त्याचवेळी अपघाताबद्दल शंका व्यक्त करीत सीबीआय चौकशीची मागणी जमावातून सुरू झाली आणि मग सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले.Gallery –
BJP leader Gopinath Munde In Parli On Wednesday, Lakhs of mourning supporters & distraught Family members on Wednesday bid a tearful ferewell to Gopinath Munde.