ओल्या सोयाबीनच्या शेंगातील दाण्यांचे आळण

Like Like Love Haha Wow Sad Angry Soy Bean Soup (Soy Bean Adan) is the one of the healthy food...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Soy Bean Soup (Soy Bean Adan) is the one of the healthy food in India. in Maharashtra Soy Bean production is done large amount so Soy Bean is one of the production who having much proteins. from Soy Bean you can generate Milk, Oil and cook this recipes . read Marathi recipes Soy Bean Soup which is very healthy and full of proteins.

soy-bean-stew-recipeसाहित्य -: ओले दाणे पाव किलो, एक कांदा, दोन ते तीन टमाटे, चार ते पाच हिरव्या मिरच्या, आले लसुणाची पेस्ट एक चमचा, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळदी पावडर, एक चमचा धने पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, थोडी मोहरी थोडे जिरे, चिमुटभर हिंग, कढीपत्ता, दोन पळी तेल, चवी नुसार मीठ, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे चना डाळीचे पीठ.

कृती -: कढईत थोडे तेल गरम करून त्यात दाणे व दोन मिरच्या चे तुकडे करून परतून घ्यावे. व मिक्सर मधून जाडसर वाटण काढून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा व मिरचीचे उभे काप करावे, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी,आलें लसणाची पेस्ट करून घ्यावी. टमाटे बारीक चिरून घ्यावे, बेसनाचे पीठ लिक्विड करून ठेवावे.

पुन्हा कढईत बाकी तेल घालून जास्त गरम करावे. हिंग पूड टाकावी. लगेच अर्धा चमचा जिरे व मोहरी टाकावी नंतर पेस्ट व  मिरचीचे काप टाकावे तळू द्यावे व नंतर कांदा टाकावा व लालसर होऊ द्यावा. तिखट, हळद, धने पावडर, टाकावेत व त्यानंतर टमाटे टाकावे व सर्व मिश्रण तेल सुटेस्तोवर शिजवावेत. त्यांनर दाण्याचे वाटण व चवी नुसार मीठ घालून दहा मिनिटे मंद आचेवर शिजत ठेवावे. भांड्यावर झाकण ठेवून झाकणावर थोडे पाणी टाकावे. (बुडाची लागू नये याकरिता) एकी कडे दीड ते दोन ग्लास पाणी उकळीला ठेवावे, सर्व मिश्रण शिजले की उकळलेले पाणी टाकावे व उकळी येऊ द्यावी त्या नंतर एक जीव होण्याकरिता बेसन लिक्विड किंचित त्यात सोडावे व पळी ने फिरवीत जावे त्याचे गोळे होऊ नये. मंद आचेवर चांगली उकळी येऊ द्यावी, त्यात चिरलेली कोथिंबिरी व गोडा मसाला टाकावा. हे आळण (आमटी) भात , पोळी व भाकरी सोबतही फार छान वाटते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories