Human Mind itself a Great magician. Our Mind create great Magics over the world. you will be doing a great mind reading trick in no time. with the help of Tratak Yog you can learn to create Great Magics and control your mind. self control on the mind itself a Tratok Yog. one you learn the tricks of Tratak yog, you also show the various Magics from your Mind. this ariticle will tell you something about Tratac Yog. Read More…
दृढ श्रद्धायुक्त मन – हे एक फार मोठे जादुगर आहे. मन अनुकूल झाले असतां ते दैवी चमत्कार निर्माण करू शकते. असे हे महान सामर्थ्य संपन्न व महा चंचल मन ‘त्राटक’ क्रियेने लवकर एकाग्र व वश होतें. त्राटकाची परिभाषा -‘त्र’ म्हणजे रक्षक-तारक ‘टक’ म्हणजे सतत अर्थात एक सारखे लक्ष लाऊन पाहणे यालाच ‘त्राटक’ म्हणतात.
* त्राटक योगाच्या अभ्यासाने दिव्य दृष्टी निश्चित प्राप्त होते. आणि तिच्या मुळे जसें ‘जे’ आपण प्रत्यक्ष पाहतों,अगदी हुबेहूब तसें ‘तें’ कितीही दूरच्या वस्तूंचें किंवा व्यक्तींचे ज्ञान बसल्या ठिकाणीच प्रत्यक्ष होवुं शकते.! आणि तो ज्या वस्तुं कडे वेधक दृष्टीने पाहतो तेथें आत्म बलाचा (व्हील पावरचा )दिव्य प्रभाव पडू शकतो. त्याची दृष्टी सामर्थ्यवान बनते. असा दिव्य दृष्टींचा साधक सर्वांवर आपला प्रभाव तात्काळ पाडू शकतो.
* असा हा त्राटक दिव्यदृष्टी योग सर्वोत्कृष्ट व विलक्षण परिणाम कारक व अलौकिक अंर्तज्ञान प्राप्त करणारा सिद्धीदायक आहें.
* ‘भ्रूमध्यभागी’ दृष्टी स्थिर व एकाग्र करावी व तेथेंच वेधक दृष्टीने एक सारखे पाहावे ‘भ्रूमध्यभागी ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहें. याच प्रमाणे भ्रूमध्यांचें ध्यान पूर्ण एकाग्रतेणे व तन्मयतेनें केल्यावर तेथें दिव्य तेजाचा सो$हं ज्योर्तिब्रम्हाचां उदय आपोआप होऊ लागतो. व अन्य दैवी चमत्कारही होतात. सूचना-: त्राटकभ्यासकाची जागा व वेळ मात्र निश्चित एकच असावी. म्हणजे दिव्य शक्तीचे प्रवाह साधकाच्या ठिकाणी नियमितपणे येउन तें अत्यंत प्रबल होवून दिव्यज्योर्तिब्रम्हाचे दर्शन होतें. मात्र हा अभ्यास अत्यंत सावधतेने व सावकाशपणें वाढवावा लागतो. यात घाई करून चालणार नाही.
” तुका म्हणे येथें न चाले तातडी । प्राप्त काल घडी आल्यावीण”||