सुप्रसिद्ध जेष्ठ नाट्यदिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि मराठी रंगभूमीवरील एक अष्टपैलू आणि वेगळे व्यक्तीमत्व विनय आपटे (६२) यांचे शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी अचानक छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे आपटे यांना शनिवारी अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. त्रास असहनीय असल्यमुळे त्यांना तत्काळ हलवण्यात आले. तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आपटेंच्या अकाली निधनाने मराठी सिनेसृष्टीसह रसिकांनाही मोठा हादरा बसला आहे. आपटे यांच्या पश्चात पत्नी वैजयंती आणि दोन मुले असा परिवार आहे. विनय आपटे हे मराठी जगत मधील एक गाजलेले अभिनेते होते.
काही दिवसांपूर्वी त्यांना छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. काल त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
Vinay Apate Picture Gallery: