भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जन्म : १४ एप्रिल १८९१ (महू)
मृत्यू : ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)
नाव : भीमराव रामजी आंबेडकरभारताच्या राज्यघटनेत आस्पृश्यतेला थारा नाही. अस्पृश्यता समूळ नष्ट करण्यासाठी व दलितांच्या उद्धारासाठी अविरत धडपनाऱ्या, झुंझार व्यक्तिमत्व असणाऱ्या त्या महापुरुषाचे नाव होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ते लहान पणापासूनच हुशार होते. पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज करून ते अमेरिकेला गेले. पुढे शाहू महाराज्याच्या सहाय्याने लंडनला जाऊन वकील झाले. त्यानंतर वकिलीच्या सरावाच्या वेळेस त्याचा समाजाशी संपर्क आला, व त्यातूनच त्यांना जातीयतेचा, भेदभावाच्या रुक्ष कडा उठून दिसू लागल्या. हरिजनांच्या उद्धारासाठी व आस्पृश्यातेच्या समूळ उच्चाटनासाठी त्यांनी अविरत कष्ट केले. महाड इथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन अशा प्रकारे असमानतेचा निषेद केला. मानवतेच्या हक्कासाठी, सर्व सामान्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले. अशा या महान दलितउद्धाराकानेच भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे पवित्र काम उत्तम प्रकारे पार पडले. त्यांना “भारतरत्न” या किताबाने सम्मानित करण्यात आले.
See Dr Babasaheb Ambedkar Latest News, Photos, Biography, Videos and Wallpapers. Dr Babasaheb Ambedkar profile Dr babasaheb ambedkar.