आजचे विद्यार्थी — उद्याचे नेतृत्व!
Like
Like Love Haha Wow Sad Angry
261

आजचे विद्यार्थी —  उद्याचे नेतृत्व

     किंवा
राजकारण  —  आजचे युवक !

students and politics
मुद्दे — * आजची भरकटलेली युवाशक्ती, —  * आजचे भ्रष्ट व नकारात्मक राजकारण, —  * समर्थ विचारवंत व उत्तम राज्यकर्त्यांचे आदर्श युवकांनी अंगीकारायला हवे,  — * राजकारणविषयक तात्विक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता, —  * राजकारणाचा सखोल व सम्यक अभ्यास .

आज राजकारणात युवा शक्तीला फार मोठे स्थान प्राप्त झाले आहे. अनेक युवा संघटना राजकारणात सक्रीय भाग घेत आहे. अखिल भारतीय स्तरावरील सर्वच राजकीय पक्षांच्या अखिल भारतीय युवक संघटना आहेत. या संघटनांचा आणि युवाशक्तीचा  सदुपयोग करून घेण्यापेक्षा त्यांच्या द्वारे चळवळ, आंदोलने, संप उभे केले जातात. दंगली घडवून आणल्या जातात. आजच्या विद्यार्थ्यातील त्वेषाचा आवेश्याचा आणि सळसळत्या  तारुण्याचा सरपणासारखा उपयोग केला जातो.त्यांना योग्य मार्गदर्शन लाभत नाही. त्यामुळे स्वत: च्या अंगातील उर्मीचा वात करून देण्यासाठी आजचा तरून वाटेल ते करायला तयार होतो. अश्या युवकांना राजकारणाचे धडे दिल्यास ते उद्याचे उत्तम राजकारणी व राज्यकर्ते होतील. आणि देश्याला उत्तम प्रभावी नेतृत्व लाभेल.

** आजचे राजकारण हे नकारात्मक आहेत. “राजकारण” या शब्दाचा खरा अर्थ सुद्धा ज्याना माहित नाही असे लोक राजकारणात शिरतात. आणि लगेच नेते आणि राजकर्तेही होतात.त्यांना राजकारणाचा गंधहि नाही आणि सामाजिक बांधीलगीची जराही जाणीव नाही. अश्या नटतस्कर, भ्रष्टाचारी, गुन्हेगार, अनैतिक मार्ग चोखाळणार्या लोकांचाच भरणा राजकीय क्ष्रेत्रात अधिकाअधिक  होत आहे.जनतेच्या समस्या, त्यावरील त्यांनी विचारही केलेला नसतो. राजसत्ता लोकांच्या कल्याणार्थ राबवण्याची कल्पना त्यांच्या स्वप्नातही नसते. मग अशी माणसे राजकारणात पडतात तरी कां ? तर स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी, स्वत:च्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी, किंवा प्रतिष्ठीतपणाच्या बुरख्या आडून राजरोष अनैतिक गोष्टी करण्यासाठी. अश्याना राजकारणात अजिबात स्थान मिळू नये. अश्यांच्या हाती देश्याचे नेतृत्व जाऊ देता कामा नये.

**  उत्तम नेता किंवा राजकारणी होण्यासाठी युवकांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. निवडणुकीत चारित्र्यसंपन्न व्यक्तीलाच मत देण्याचे कर्तव्य पार पाडावे. त्यांनी आर्य चाणक्य, लोकमान्य टिळक, अरविंद घोष, सेनापती बापट, महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री , अटलबिहारी बाजपेयी यां सारखी निरपेक्ष सेवावृत्ती, नीतीमूल्यांची जपणूक, आदर्श वागणूक, सत्ता आणि संपत्तीसंबंधीची उदासीनता, संयमी वृत्ती, अभ्यासू वृत्ती, अंगी बाणवली पाहिजे देश्याच्या समस्यांवर अभ्यास करून त्यावर उपाय यजना केल्या पाहिजेत, काहीवर्षे निरलस समाज सेवा केली पाहिजे.हेच युवक उद्याचे आदर्श राज्यकर्ते होऊ शकतात. आणि जनमानसात आवडीचे नेते बनू शकतात. त्यासाठी उत्तम राजकर्त्याचे गुणही त्यांनी आत्मसात केले पाहिजे. श्रीराम, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर यांच्या सारखे “बहु जन हिताय-बहु जन सुखाय” राज्य असले पाहिजे. राज्यकर्ता हा भोगशून्य योगी असावा. आपले राज्य रामराज्या सारखे आदर्श करण्याचा त्याचा प्रयत्न असावा. प्रजेच्या हितासाठी केव्हाही हस्त सत्तेचा व सुखर्सवस्वाचा त्याग करण्याची त्याची तयारी असावी. कारण सत्ता संपत्ती नव्हे, तर समाज सुख हे त्याचे अंतिम ईप्सित असावे.

** असे आदर्श राजकारणी युवक उद्याचे नेते तयार करण्यासाठी ईतर अभ्यासक्रमांप्रमाणे राजकारण प्रशिक्षण केंद्र उभारावे.त्यांत तात्विक व प्रात्यक्षिक  असे दोन भाग असावेत. तात्विक विषयात राज्यशास्त्र,  नीतीशास्त्र, आदर्श समजल्या गेलेल्या  राजांच्या व राज्यांच्या इतिहासाचा व चरित्रांचा अभ्यास असावा. भारतावरील समस्या व त्यावरील उपाय यांचा अभ्यास करण्यासाठी प्रात्यक्षिक भाग असावा. त्यामध्ये देशभर प्रवास करून सखोल अभ्यास करण्यासाठी त्या विशिष्ट परिसरात तेथील स्थानिक लोकांसोबत राहून त्यांच्या अडचनींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.त्यामुळे त्यांच्या अडचणींची तीव्रता लक्षात येईल. व त्यावर योग्य ते उपाय सुचवता येईल. उपायांचा पाठपुरावा करून तेथील अडचणींचे निवारण झाले कि समस्येचा अभ्यास पूर्ण झाला असे समजावे. अश्या दोन तीन समस्यांचा तरी अभ्यास प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात राहून प्रकल्प पद्धतीने केला कि अडचणी, त्यावरील उपाय,त्यासाठी येणारा संभाव्य खर्च रक्कम उभी करण्यासाठी त्या विशिष्ठ परिसरात तेथील स्थानिक लोकान बरोबर राहून त्यांच्या अडचणीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.व ती रक्कम उभी करण्यासाठी आखाव्या लागणार्या योजना व त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही ईतका समग्र विचार होवून युवकाचा देश्याकडे बघण्याचा एक दृष्टीकोण तयार होईल देश परिस्थितीचे यतार्थ ज्ञान त्यांना होईल. या मार्गातील खाचखड्गे आणि कष्ट लक्षात घेवून ते सर्व झेलण्याची त्याची मानसिक तयारी होईल. नेतृत्व करण्यास लागणार्या गुणांचा परिपोष होवून तो राजकारणात उतरण्या योग्य होईल. अश्या युवकांच्या हाती देश्याचे नेतृत्व गेल्या नंतर  देश्याचे राजकारण आदर्श होवून भारतात स्वराज्याचे सुराज्य म्ह्णजेच रामराज्य निर्माण होईल.

** या प्रशिक्षणातून राजकारणाचे खरे व्यापक स्वरूप त्यांच्या ध्यानी येईल. राजकारण हा गुलाब पुष्पांनी आच्छांदलेला राजमार्ग नसून तो कंटकमी मार्ग असल्याचे त्यांच्या प्रत्ययास येईल. अश्या या मार्गावरून जाण्याचे साहस करणार्या युवकातून यशस्वी राजकारण आणि आदर्श राज्यकर्ते  निर्माण होतील यात शंकाच नाही. तेव्हा या खडतळ राज मार्गा वर येताना विचारपूर्वक पाउल टाकूनच राजकारण स्वीकारले पाहिजे हि समझदारी पाहिजे.

“Youths As the future leader”, Why is youth participation in today’s society very important/necessary? Youth are the future leaders of any society in the world.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
261
, , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: