पोप बेनेडिक्ट यांनी पोप या पदावरून राजीनामा दिल्या नंतर व्हॅटिकन सिटीत होत आहे नव्या पोपच्या निवडीची सुरवात झाली आहे. त्या करिता संपूर्ण जगातून १२० कार्डिनल्स व्हॅटिकन इथं जमले आहेत. आता नवा पोप कोण होणार हे लवकरच कळेल . पोपची निवडणूक प्रक्रिया साधारण तीन दिवस चालते. पोपच्या निवडीसाठी उपस्थित कार्डिनल्सपैकी दोन तृतीयांश मतांची गरज असते. रोज सकाळी आणि दुपारी असं दोन वेळा मतदान होतं. प्रत्येक कार्डिनल्सला एक आयताकृती कार्ड दिलं जातं. त्यावर ते आपल्या पसंतीच्या उमेदवाराचं नाव लिहीतात. जोपर्यंत स्पष्ट बहुमत मिळत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहते. तीन दिवसांत निवड झाली नाही, तर ज्येष्ठ कार्डिनल्स पोपची निवड करतात. निवडणुकीतल्या प्रत्येक फेरीनंतर चॅपलच्या चिमणीमधून एक विशिष्ट प्रकारचा धूर सोडला जातो. त्या फेरीत पोपची निवड झाली नसली तर एक केमिकल त्या धूरात मिसळलं जातं. ज्यावेळी पोपची निवड होते, त्यावेळी स्वच्छ पांढरा धूर चिमणीबाहेर सोडला जात. अश्या वेगळ्याच पद्धतीन पोपची निवड केली जाते. पोपच्या निवडीच्या वेळेसची जत्रा पाहण्या सारखी असते. देवांचादेव मानण्यात येत असणाऱ्या पोपची निवड हा व्हॅटिकन सिटीत एक महत्वाचा विषय आहे.
पोपच्या निवडीचे चित्रे :
Who will be chosen as the new pope? , News abut news pope election in vatican city, Who will be chosen as the new pope?