बरेच दिवसान पासून रखडलेला मोनो रेल हा प्रकल्प आता पूर्ण होणार अशी अशा आहे. देशातील पहिली मोनो मुंबईच्या पट्रीवर ऑगस्टमध्ये धावेल. या रेलचे बरेच काम उरकलेले आहे. पहिल्या टप्प्यातील बहुतांश काम पूर्ण झाले असून, साडे आठ किलोमीटर अंतरावरील ‘ट्रायल’ आज यशस्वी झाली आणि मोनोचा मार्ग मोकळा झाला. आता प्रतीक्षा आहे ती सुरक्षा प्रमाणपत्राची. मोनो रेल धावणार हि सुखद बातमी मुंबई कारांकारिता आहे.
हा प्रकल्प बरेच दिवसान पासून सुरु आहे. मोनो रेल्वे प्रकल्पाचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. मुंबई मधील रेलच हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. अत्याधुनिक साधांनी परिपूर्ण असा हा प्रकल्प आता लवकरच सुरु होणार आहे. चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज (जेकब सर्कल) अशा दोन टप्प्यांत १९.५४ किलोमीटर अंतराची ती राहणार असून, एकूण १९ स्थानके असणार आहेत. त्यापैकी ८.८0 कि.मी. अंतराच्या पहिल्या टप्प्याचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना व अन्य अधिकार्यांनी आज चाचणी घेतली.
Source : Marathi Unlimited.