डॉ पंजाबराव देशमुख




Like
Like Love Haha Wow Sad Angry
16281

जन्म २७ / १२ /१८९८ [ गीता जयंती ], मृत्यू १०/ ४/ १९६५ [ राम नवमी ]

dr panjabra deshmukhडॉ. पंजाबराव देशमुख  यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ  या गावी २७ डिसेंबर १८९८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव राधाबाई, हे त्यांचे पहिलेच अपत्य. राधाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. पण शिस्त फार कडक होती. त्यांना मुलांनी कसेही वागणे आवडत नसे त्यामुळे पंजाबराव यांना चांगले वळण लागले. पापळ ला १८७४ ला त्यांची शाळा सुरु झाली. १९०६ ला त्याना शाळेत टाकण्यात आले. तेव्हा ते ७ वर्षाचे होते. शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यंच्या वडिलांनी घरीच एका शिक्षकाची राहण्याची व्यवस्था केली. गोसावी गुरुजींचा त्यांच्यावर फार प्रभाव पडला. मराठी व्याकरण  व गणित त्यांचे फार चांगले होते. ते कुशाग्र बुद्धीचे निग्रही होते. नियमितपणा, आज्ञाधारकपणा मनोनिग्रह त्यांच्या स्वभावात रुजू लागले. रेखीव पोषाखाची व निटनेटकेपणाची त्यांना गोडी होती. गावात तिसर्या वर्ग पर्यंत शाळा होती. नंतर चान्दुरातील शाळेत घालून चौथ्या वर्गाची परीक्षा पास केली. पुढील शिक्षण कारंजा लाड येथे झाले. असे अनेक अडचणींना तोंड देऊन १९१८ ला ते दहावी उच्च श्रेणीत पास झाले. १९१८ साली २५जूनला त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन  कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. १९१८ साली पुण्याला प्लेगने कहर केला. या रोगा ने बर्याच लोकांचा बळी घेतला. त्यामुळे पुण्यातील शाळा कॉलेज बंद करण्यात आले. त्यामुळे त्याना पापळ ला परत यावे लागले. नंतर काही दिवसाने परत कॉलेज सुरु झाले. अभ्यास नियमित चालू झाले. आणि त्यांनी आपले इन्टरपर्यंत शिक्षण अत्यंत नेटाने पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी आपल्याला इंग्लंडला जायचे असे त्यांनी मनाशी पक्के ठरविले. इंग्रजीतून भाषण व लेखन करण्यासाठी त्यांनी अभ्यास केला. पाश्चात्य संस्कृती, शिष्टाचार, चालीरीती व सभ्यता याचे सूक्ष्म अवलोकन केले. त्यांनी इंग्लड ला जाण्याची गोष्ट घरी काढली तेव्हा आई व  काकांनी हि कल्पना उचलून घेतली त्यांना आपला मुलगा एवढा मोठा होतो कि परदेशात जातो. त्यांना फार अभिमान वाटला. पण त्या खर्चा साठी शामरावांना संपूर्ण शेती गाहाण टाकून पैसा उभा करावा लागला २१ ऑगष्ट १९२० रोजी पंजाबराव एस. मलोत्रा यांच्या बोटीने ७ सप्टेंबर १९२० ला इंग्लंडला पोचले. ते कॉलेज मध्ये प्राध्यापक व विध्यार्थ्यान सोबत फार जिव्हाऴयाने वागत. अत्यंत खडतर जीवन जगत पंजाबरावांनी अभ्यास करून उच्च विद्याविभुषीत होउन डॉ.पंजाबराव १५ जुलै १९२६ रोजी मुंबई गेट वे ऑफ ईंडीयावर उतरले. अमरावती जिल्ह्याच्या ईतिहासात हि सुवर्ण अक्षराने लिहिणारी घटना होती. शामराव देशमुख या सामान्य शेतकर्याने आपला मुलगा सातासमुद्रापलीकडे पाठवावा आणि हा सहा वर्ष्यात विद्येचा डॉ. परत यावा यापेक्षा मातोश्री राधा बाई व शामरावाना कोणता आनंद हवा होता? डॉ. पंजाबराव देशमुख पापळला आले या बातमीने सारा वर्हाडचा आसमंत फुलला. ठिकठीकाणी त्यांच्या सत्काराचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले.

**शिक्षणामुळे होणारी दैना,अज्ञांन, निरक्षरता हा शाप समाजाला आहे. हे त्यांनी ओळखून त्यांनी श्री शिवाजी मराठा हायस्कूल काढण्याचा निर्णय घेतला. १जुलै १९२५ हा दिवस अमरावतीचे ऎतिहासात अत्यंत महत्वाचा व सुवर्ण अक्षराने लिहावा असा ठरला. गोपाळराव देशमुखानच्या आवारात एका शेड खाली एक महिन्याच्या आतच सरकार मान्यता मिळाली,पण मराठा समाजात पदवीधर तरुणांचा तुटवडा असल्याने हे विद्यालय चालविणे फार कठीण बाब होऊन बसली होती.  ह्या विद्यालयात एम.ए.ऑनर्स, डी फिल्ड, बार-ऑट-लॉ असा महामानव शिक्षक म्हणून विना वेतन काम करणारा लाभला. आपल्या अगाध ज्ञांनाचा उपयोग मराठा पिढीतील तरुणांना शिक्षणात प्रेम निर्माण करण्यात त्यांनी केला. त्यांनी श्रद्धानंद बोर्डींगची स्थापना केली. समाजातील बौद्ध, मांग, चांभार, मुसलमान असे सर्व विद्यार्थी त्यांनी बोर्डिंग मध्ये जमा केले. हे एक क्रांतिकारी पाउल होते.  सार्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण देऊन हजारो विद्यार्थी बाहेर पाठविले. हि त्यांची कितीतरी दैदिप्यमान क्रांती होती!

** शिक्षणा सोबत विद्यार्थी मजबूत व सुदृढ बनावेत असे त्याना वाटे.या साठी त्यांनी १९२६ साली श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना केली.ते करते समाज सुधारक होते. २६/११/१९२७ रोजी कुमारी विमल वैद्य या सोनार समाजातील मुलीशी त्यांचा विवाह झाला. १४ डिसेंबर १९३० ला नागपूर मंत्रीमंडळात मंत्री म्हणून त्यांची निवड झाली. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या सारखा भारतिय कृषक  आणि कृषी यावर प्रेम करणारा भूमिपुत्र कुणीच नव्हता. तो त्यांच्या जीवन निष्ठेचा मानबिंदू होता.  शेतकर्यांच्या विविध प्रश्ना बद्दल ते जागरूक असत. मंत्रीमंडळात त्यांनी शेतकर्यांच्या हिताचे बरेच कार्य केले.

** विद्यालय, महाविद्यालय, कृषी विद्यालय त्यांनी सुरू करून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेली. राजकारणा सोबत समाजासाठी शैक्षणिक कार्य तसेच क्रांती चे हि पाउल ते टाकीत. स्वतंत्र भारताचे कृषीमंत्री म्हणून त्यांची झालेली निवड हि एका भूमी पुत्राच्या कार्याचा गौरव ठरली. हे शेतकर्यांचे नायक ठरले.

** भारतात वाघिणीचे दुध पिउन आलेला हा नवा क्रांतिकारक सामाजिक, धार्मिक, आर्थिक राजकीय क्ष्रेत्रात प्रस्थापितांचे विरुद्ध बंद पुकारून पुढे येत होता. जीवनात प्रत्येक क्षेत्रांत क्रांती करनार्या या महा पुरुषाने जगभर भ्रमण केले. ईटली, रोम, जर्मनी मध्ये प्रवास केला. भारताच्या संसदेत अमरावती जिल्ह्याचे नाव रोशन केले.  प्रत्येक क्ष्रेत्रांत विचार पूर्वक पाउल टाकले.सतत चिंतन,मनन, व देशातील सामान्य माणसाच्या उद्धारासाठी झटणारे त्यांचे मन होते. १० एप्रिल १९६५ रोजी रामनवमीच्या दिवशी रात्री ११.३० वाजता दिल्ली येथील विलिंग्डन  हॉस्पिटल मध्ये त्यांचे देहावसान झाले.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry
16281




, , , , , , ,



Menu