भागवत सांप्रदायाला सामोरे आणनारे संतश्रेष्ठ




Like
Like Love Haha Wow Sad Angry

namdev maharajभागवत सांप्रदायाला ( Bhagwan Sampraday )सामोरे आणनारे संतश्रेष्ठ, कीर्तन शिरोमणी श्री नामदेव माहाराज,यान बद्दल माहिती वाचू यात !
नामदेवांच्या घराण्याचे मुळ ठिकाण नरसी-बामणी हे परभणी जिल्ह्यातील,हि दोन वेगवेगळी गावे होत पण संबोधताना जोड नावाने म्हणतात.तेथे त्यांची समाधी व देऊळ नरसी गावापासून जवळ असलेल्या कयाधू (कयाड )नदीच्या काठी असून तेथे फाल्गुन वद्य ११ला यात्रा भरते. * त्यांची आई गोणाई वडील दामाशेठी, नामदेवांच्या जन्मापूर्वीच त्यांचे आई-वडील पंढरपुरी येउन विठ्ठल भक्ती करून तेथेच स्थायिक झालेत,गोणाई व दामा शेठी यांनी विठू रायाला केलेल्या नवसाने त्यांना ”नामदेव” ( Namadev )हे पुत्र रत्न प्राप्त झाले. यांचा जन्म शके ११९२ म्हणजे ई.स. १२७० कार्तिक एकादशी २६ ऑक्टोबर चा होय. ( हि तारीख पूर्वी रूढ असलेल्या ज्युलियन पद्धतीची आहे.) त्यांना जन्मजातच दैवी सामर्थ्य होते. त्यांच्या जन्मा बद्दल काही दंत कथा आहेत पण त्याना पाठ पुरावा नसल्याने त्या उल्लेखात नाहीत. त्यांच्या ”प्रसवली माता मज मळमुत्री ”या अभंगातून स्पष्ट होते कि त्यांनी आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. नामदेव हे तरूनपणी दरोडेखोर होते असेही काहि गैरसमज होत असत पण असे कुठल्याही संत कवींच्या अभंगात त्यांच्या चरित्राचा उल्लेख आलेला नाही. नामदेवांचा जन्म शके ११९२  त  झाला.त्यांचे वय ज्ञांनेश्वरांच्या समाधी काळी,म्हणजे शके १२१८ मध्ये ते २६ वर्षाचे होते. त्याही पूर्वी त्यांनी ज्ञानेश्वरां सोबत तीर्थयात्रा देखील केल्या होत्या आणि त्याही पूर्वी ज्ञानेश्वरांच्या सांगण्या वरून नामदेवांनी विसोबा खेचरांन कडे जाउन त्यांचा अनुग्रह घेतला. ज्ञांनेश्वरमहाराजांची व नामदेवांची प्रथम भेट शके १२१४ च्या सुमारास झाली.  त्यावेळी ते २०,२१ वर्षाचे असावेत.  संत ज्ञांनेश्वर महाराजांनी ( Sant Dhyaneshwar Maharaj )शके १२१८ मद्ये समाधी घेतली. त्यानंतर ५४ वर्षे संत नामदेव महाराज जिवंत होते. त्यांचा अंत शके १२७२ मध्ये झाला.विठोबांच्या चरणी कल्पतरूची छाया उपभोगणारे,कामधेनूचे दुभते अनुभवणारे आणि पंढरीरायाचे प्रेम भंडारी झालेले संत नामदेवांनी ज्ञांनेश्वरांच्या सहवासात उत्तरेची तीर्थयात्रा एकवेळ केलेली होती तरी देखील ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्या नंतर ते पुन्हा उत्तरे कडे गेले. पंजाबात गेल्या नंतर तेथे त्यांचे १८,२० वर्षे वास्तव्य झाले.शिखांच्या आदिग्रंथात– ग्रंथ साहेबात नामदेवांच्या नावा वरील ६१ पदे ( अभंग )  समाविष्ट करण्यात आलेली आहे.त्यांच्या हिंदी भाषेतील काही रचना सुद्धा आहेत. ‘ग्रंथ साहेबातील ‘ पदे ”संत नामदेवजीकी गुरुबानी” म्हणून प्रसिद्ध आहेत. ती पदे बहुतांशी शिख धर्मियांच्या नित्य पठ्नातही आहेत. त्यात विठठलाच्या उल्लेखातून लक्षात येतो. पंजाब,जि. अमृतसर येथील नामदेव मंदिरात मिळणार्या माहिती वरून ” ग्रंथसाहिबा” तील नामदेव म्हणजे पंढरपुरचे ज्ञानदेव समकालीन संत नामदेव हेच होत.

** तेराव्या शतकातील वारकरी संप्रदायाची विचारसरणी आणि भागवत धर्माचा प्रचार करण्याचे महत्वाचे कार्य संत नामदेवांनी उत्तरेकडील प्रदेशात केले. हे त्यांचे स्वप्न अलौकिक कामगिरी करून त्यांनी  साकार केले. भागवत धर्माचे महत्व उत्तरेकडील लोकांना पटवून देणारे संत नामदेव हेच पहिले शिरोमणी होत. पंढरीरायां बद्दल उत्कटभक्ती व अपुर्वाईचा मनोभाव पदरी बाळगणार्या संत नामदेवांनी आपले अखेरचे दिवस पुन्हा पंढरपुरी घालविले आणि वयाच्या ८० व्या वर्षी तेथेच आपला देह ठेवला.पंढरपुरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या प्रवेश द्वारातील ”नामदेवांची पायरी ” ( Namdewachi Payari )हि त्यांची समाधी म्हणून ओळखली जाते.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



Menu