He Govinda He Gopala Kesava Madhava, The absolute Truth is perfect and complete, and because He is He – O Govinda – name for Krishna which means the reservoir of all pleasure
हे गोविंदा मला शरण द्या..मी गाय !
मी गाय आहे: कामधेनूची वंसज: जेव्हा पासून पृथ्वी वर जन्म घेतला तेव्हा पासून आपले गोड, मधुर दुध मानव जातीला पाजून त्यांचे पालन केले, माझी संताण सुद्धा नाना प्रकारे मानव जातीला मदत करीतच आहेत. पण दु:ख एवढेच कि आता तर या आधुनिक मानवाने माझी विटंबना मांडलेली आहे, माझा सम्मान करणे विसरलेच फार निर्दयीपणाने वागतात. मला आजही माझे अतीत आठवते कि देवादिकां मध्ये आदराचे स्थान होते.मला आश्रय मिळायचा. तुम्ही तर माझी खूप सेवा केलीत, राजा दिलीपाने माझ्या रक्षणार्थ स्वत:चे मांस व्याघ्राला द्यायला तयार झाले होते, पण माझी रक्षा केलेली! पहिले मला गोमाता म्हणून आदर मिळायचा. लोक अत्यंत आदराने स्वत:च्या अंगणात बांधायचे देवतुल्य समजून माझी पूजा करायचे, प्रथम मला नैवद्याचे ताट दिल्या शिवाय स्वत:जेवण घेत नसत! माझे दर्शन त्याना शुभ शकुन वाटायचे.
मला रोज अंघोळ घाणून व्स्त्रभूष्ण चढवायचे, परिवारातील लहान मोठी मंडळी मला स्म्मानानी बघायची. मला घरचा एक सदस्य मानायचे मला पूर्ण सुख-सुविधा ध्यायचे. माझ्या वृद्धा अवस्थेतही मी दुध देवू शकत नसल्यावरही माझा कधीच त्याग करीत नसत. आजीवन माझी सेवा करून माझे अंतिम संस्कार चांगल्या स्वरूपाचे होत असे. जुने लोक माझ्या दुधावर माझ्या बालकांचा प्रथम अधिकार मानत असत; माझ्या बालकांचे पोट भरल्या वरच स्वत:साठी दुघ काढीत असत; मलाही मानवाच्या बालकांची चिंता असायची मी त्याना पुरेसे दुध देवू शकत होते, ते माझ्या हिरव्या चाऱ्या साठी तळमळ करायचे मला घेवून दूरदूर भटकंती करायचे. पण आता तस काहीच राहिलेलं नाही. मला घरांत पाळत नाही, जे मला शरण देतात ते ढुग्ध व्यवसायी लोक जास्तीत जास्त लाभार्जन व्हावे या उद्देशानेच ठेंवतात, थोडासा चारा देवून जास्तीत जास्त दुघ मिळावे हाच त्यांचा उद्देश असतो. प्रथम पासून अंतिम थेंबा पर्यंत दुध काढणे त्यांचे रोजचेच कांम झाले आहे. एवढेच नाही तर ते माझ्या मानेत किंवा नाजूक अश्या वक्षांत सुया टोचून मला अनंत अश्या पीडा देतात. त्यावेळी च्या प्राणांतिक यातना होतात, हे गोविंदा तुम्ही अंर्तयामी आहात तेव्हा माझ्या पीडा तुम्ही समजू शकता. मी साधीशी बोलता न येणारी नारी जात आहे. मी कुणालाही काही सांगु शकत नाही, आताची सरकार जंगली प्राण्यासाठी अरण्ये बनवू शकतात, आमच्या कडे त्यांचे अजिबात लक्ष नाही, रोज रोज माझे कितीतरी हजारो वंसज विना कारण मारल्या जात आहे. याकडेहि लक्ष नाही. ईतके घोर कृत्ये करताना त्यांना काहीच कसे वाटत नाही.आम्हा गाय जातीवरच हे कोपित कां झालेले आहेत.हि सरकार असले कृत्य मुकाट्याने कां बरे पाहत आहे. परदेशात आम्हाला पाठवून आमचे कितीतरी हाल होतात, या अघोरी लोकांनी आम्हाला आपले ख्याद्य बनविले आहे, त्यावर काही उपाय नाही कां ? एकवेळी माता म्हणणारे मानव जात माझ्या कडे दृष्टिपात करू शकतील कां ?
मला आता– ”गोमाता ” या नावाची लाज वाटायला लागलेली आहे !
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
2 Comments. Leave new
i really like this article. cow is like our mother.
good article.