मुंबईत वडाळा येथील मोनोरेलच्या कारशेडमध्ये एमएमआरडीएच्या अधिकार्यांच्या वतीने मोनोरेलची चाचणी घेण्यात आली. येत्या वर्षभरात चेंबूर-वडाळा या पहिल्या टप्प्यादरम्यान मोनोरेल धावणार असून, या मार्गावरील जवळपास ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. भारतातील मोनोरेल हा सर्वात पहिला प्रोजेक्ट आहे. सर्व भारत या रेल गाडीची वाट पाहत आहे. विशेषतः मुंबईकर या रेल करिता फार उत्सुक आहेत.