आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग होत असल्याची धक्कादायक माहिती एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या बीसीसीआयने आज पाच खेळाडूंना १५ दिवसांसाठी निलंबित केले.
शलभ श्रीवास्तव (किंग्ज इलेव्हन पंजाब), टी. सुधेंद्र (डेक्कन चार्र्जस), मोहनिश मिश्रा (पुणे वॉरियर्स), अमित यादव (किंग्ज इलेव्हन पंजाब) आणि अनुभव बाली हे ते पाच जण आहेत. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीचे माजी अध्यक्ष रवी सावनी यांची चौकशी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ दिवसांत ते अहवाल सादर करतील.