फेसबुकच्या जाळ्यात ओढल्या जाणार्या युवकांचे प्रमाण शहरात पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. त्यातील काहींच्या घरी इंटरनेट आहे, तर अनेकांनी खास फेसबुकसाठी मोबाईल घेऊन त्याद्वारे संपर्क कायम ठेवले आहेत. सरासरी दिवसाकाठी तासभर फेसबुक वापरणार्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही.
शालेय तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणार्या सुमारे २0 विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यातील ११ विद्यार्थी फेसबुकचा वापर करतात, असे आढळून आले. त्यातील दोन मुले मोबाईलवर, चार मुलांकडे घरी संगणक, तर पाच मुले सायबरकॅफेत जाऊन फेसबुक वापरतात असे दिसून येते. त्यात शालेय मुलांचे प्रमाणही मोठे आहे.
संपर्काचे माध्यम
महाविद्यालयातून घरी आल्यानंतर मित्रांशी संपर्क ठेवणे अथवा पसरलेल्या शालेय मित्रांना शोधून त्यांच्याशी असलेले मैत्रिबंध टिकविणे आणि नवे मित्र निर्माण करणे यासाठी फेसबुकचा वापर करतो. सायबर कॅफेत जाऊन फेसबुकचा वापर करण्याऐवजी घरच्या संगणकावर इंटरनेट घेऊन त्याचा वापर करणे परवडते. त्यामुळे घरीच त्याचा वापर करतो. दररोज त्याचा वापर करायला वेळ मिळत नसला तरी दोन, तीन दिवसाआड त्याचा वापर करतो आणि शक्यतो रात्रीच्या वेळेस सर्व मित्र ऑनलाइन असतो. आमचा सर्व ग्रुप फेसबुकवर आहे.
Leave a Reply