सक्षम लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीला पाठिंबा मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीवर असलेल्या अण्णा हजारे यांना भेटीची परवानगी नाकारणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आता अण्णांशी चर्चेची सशर्त तयारी दाखविली आहे.
जोपर्यंत अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदीया आणि किरण बेदी यांची गराडा अण्णा दूर करीत नाहीत, तोपर्यंत अण्णांशी चर्चा करण्याची गरज मला वाटत नाही, अशा शब्दात शिवसेना प्रमुखांनी आपली भूमिका मांडली
आहे. एका पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी
संवाद साधला. त्यावेळी ही भूमिका मांडली.
जिकडे तिकडे मी अण्णा मी अण्णा कोणतेही चॅनल सुरू करा तेथेही मी अण्णाच. हे काय सुरू आहे. आजची पत्रकारीता पेड न्यूजवर पोसली
जात आहे. पत्रकारांमध्ये प्रगल्भता उरलेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
Leave a Reply