|| तमसो मा ज्योतीर्गमय ||
घालवी अंतर्मनीचां हा तिमिर
दावी मज त्व प्रकाश तो प्रखर ||१ ||
दाटली वैरीन निशा अशी काळी
न दिसे मज नीजधाम जवळी ||२||
अनुसरावा तुझाची प्रभो पथ
एकची पद पुरे! दूर देशांत ||३||
नुमजे मज लवही पदन्यास
न मी पुसे, तमी, मज हीच आस ||४||