मोदींना ‘ क्लीन चीट’!
अहमदाबाद : गुजरातमधील गोध्रा जाळीत कांडानंतर राज्यभर उसळलेल्या दंगलीत अहमदाबादमधील ‘गुलबर्ग’ सोसायटी मध्ये घडविण्यात आलेल्या हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथक (एसआयटी) ने मंगळवारी न्यायालयात सादर केलेल्या अंतिम अहवाल (क्लोजर रिपोर्ट) मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘क्लीन चीट’ देण्यात आली आहे. या प्रकरणी मोदीविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे या अहवालात स्पस्ट झाले आहे.
या अहवालाची माहिती देताना अहमदाबादच्या महानगर दंडाधीकारयानी सांगितले, की दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या विधवा झकिया जाफरी यांनी आरोप केलेल्या एकही व्यक्तीविरुद्ध एसआयटी कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळले नाहीत.
Source : Marathi Unilimited.