Kabab Harabhara :
It’s a healthy and delicious indian veg snack recipe made with spinach, boiled potatoes, ginger, green chillies. It is a vegeterian kabab which are not deep fried. alternately these kababs can be baked.
पालकाची भाजी खायला मिले कंटाळा करतात. मात्र पालकामध्ये लोह आणि जीवनसत्वे अधिक प्रमाणात असल्यमुळे त्याचा आहारात समवेश करणे आवश्यक आहे. मुलांना आवडेल अशा चवीचे आणि झटपट तयार होईल असे कबाब हरभरा घरी तयार केल्यास मुलांना पालकातील जीवनसत्वे मिळतील आणि मुले हा पदार्थ आवडीने खातील.
साहित्य : एक जुडी पालक, हिरवी मिरची, लसून, कोथिंबीर, पुदिना चवीनुसार, अर्धा किलो बटाटे उकळून तयार केलेला लगदा, मीठ चाट मसाला, मैदा.
कृती :
पालक धुवून, चिरून थोड्या तेलावर पाच मिनटे परता. गार झाल्यावर पुदिना, मिरची, कोथिंबीर आणि लसून एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा. या मिश्रणात बटाटा, चाट मसाला, मीठ आणि थोडा मैदा घालून लहान कबाब गोळे बनवा. नंतर हे गोळे तळा. (त्यात एक थेंब हिरवा रंग घाला म्हणजे हिरवा रंग उठून दिसेल. गोळे करण्याइतपत मैदा घाला) कांद्याच्या चकत्या बरोबर खायला द्या.
Source :
Marathi Unlimited
hema Bhendarkar
hema.bhendarkar @gmail .com
nagpur