आयुर्वेदातून —– हृदयरोग जाऊन घेऊ




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
The heart muscle requires a constant supply of oxygen-rich blood to nourish it. The coronary arteries provide the heart with this critical blood supply. If you have coronary artery disease, those arteries become narrow and blood cannot flow as well as they should. Fatty matter, calcium, proteins, and inflammatory cells build up within the arteries to form plaques of different sizes.

For more details kindly read below article..

trimurtipanel-sketch-1050x700_5749df0f07ac0

हृदयरोगाचे प्रमाण दिवसें दिवस वाढतच आहे. यात आधुनिक वैद्यक शास्त्रातील चिकीत्सापद्धती पूरक ठरू शकेल. अनेक वैद्यांचे मत होताना आढळत आहे आणि या पार्शवभूमीवर आयुर्वेदयाप्राचीन वैद्य शास्त्रांत हृदयरोगासंबंधी केलेला उपचार समजून घेणेयोग्य ठरेल.  मास धातूने घटित असा हृदय हा अवयव आहे. संपूर्ण शरीराला रक्त पुरवठाकरण्याचे कार्य या हृदयाच्याक्रियेमुळेच होते. अवयवात काही विकृती उत्पन्न झाली तर विविध लक्षणे शरीरात निर्माण होतात परंतु हि विकृती निर्माण का होते ? हे आयुर्वेद संहितातून कळते. ‘ माधवनिदान ‘ याग्रँथात सांगितले आहे .

अतिशय उष्ण व अतिशय जड पदार्थ खाणे.

तुरट, व कडूया दोन चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे.

आधीचे अन्नपचण्यापूर्वीच दुसरे जेवण करणे

अतिशय चिंत्ता करणे.

मल, मूत्र अशा शरीराबाहेर पडणाऱ्या गोष्टींना रोखून धरणे. (  याला वेग धारण करणे असे म्हणतात )

अतिशय श्रम करणे.

हिहृदयात विकृती निर्माण करणारी कारणे आहे. यानेवात, कफ, पित्त वाढून हृदयात विकृती निर्माण करतात.

यारोगाचीसामान्यलक्षणे

वैवर्ण्य –  यामुळेशरीरालावैवर्ण्य (म्हणजेपांढुरकेपणा) निर्माणहोतात.

मूरछा —   रुग्णाची शुद्ध हरपते.

ताप येतो. खोकला येतो. अधिक काळ पर्यंत उचकी लागणे.  दम लागणे हि लक्षणे हृदयरोगात दिसतात.

तोंड कोरडे पडणे..  अतिशय तहान लागणे. हि सामान्य लक्षणे दिसून येतात.  तसेच हि लक्षणे इतर रोगांतहि असतात. म्हणून निदान हे योग्य वैद्यांकडूनच करावे. आयुर्वेद संहिताकरांनी केवळ सामान्य लक्षणा वरून हृदयरोग याचे वर्णन थांबलेले नाही. प्रत्येक दोषाच्या तीव्रतेनुसार वेगवेगळ्या लक्षणांचे वर्णन त्यांनी केलेले आहे.

हृदयाचे ठिकाणी वेदना — वातदोष याच्या अधिक्यामुळे, वातामुळे होणाऱ्या हृद्यरोगा मध्ये हृदयाच्या ठिकाणी वेदना  होतात. हृदयाच्या ठिकाणी काठीने मारत असल्याचा आभास होतो. व हृदय धडधडते, याच प्रकारातून पित्तामुळे होणारा हृदय रोगांत अतिशय तहान लागते. हृदय व्याकुळ होतो धाम सुटतो. तोंड कोरडे पडते. कफामुळे होणाऱ्या हृदय रोगात, शरीर जडपडते, तोंडात सारखे पाणी सुटते. आणि हृदय जखडून गेल्या सारखे वाटते.  यातूनच एक कृमिज हृदयरोग म्हणून एक प्रकार सांगितलेला आहे. यात तर हृदयांतती व्रवेदना होतात. तोंडाला पाणी सुटणे, डोळे मलीन होणे, अंगावर सूजयेणे हि लक्षणे दिसून येतेय.

अशा प्रकारे हृदयाचे निदान करताना कफ, पित्त, आणि वात यातीन दोषांपैकी कोणत्या दोषांचे प्राबल्य त्यामध्ये अधिक आहे ते बघावे लागेल. हा सूक्ष्म अभ्यास आपल्या पूर्वजांनी करून ग्रँथानमध्ये मांडून ठेवलेला आहे.

आणि प्रमुख लक्षणे –   १) छातीतील हृदय पेशी दुखणे.  २) छाती धडधडणे, ३) श्वास घेण्यास त्रास होणे. ४) अतिशय घाम येणे. ५) अतिशय थकवा येणे . हि सर्व लक्षणे एकत्रित स्वरूपात हृदयरोगाती लरुग्णा मध्ये दिसतात.

उपचार —  यांवर आयुर्वेद शास्त्रकरांनी विविध उपचारांचे वर्णन केलेले आहे. सुरवातीला सांगितलेल्या हृद्यरोगातील कारणांना टाळणे, अनेक औषधी सांगताना याशास्त्रकरांनी हृदयाला बळदेणाऱ्या ( पर्यायाने हृदयाची कार्यक्षमता वाढविणाऱ्या ) अशा अनेक औषधांची उल्लेख आहे.

अर्जुनहि एकऔषधी हृदयरोगावर गुणकारी आहे. या झाडाचि साल ओषधात वापरतात. यासाठी लसूण हा देखील एक वरदान आहे.  द्राक्षे तसेच आंबा हा देखील हितकारी आहे.  पुष्कर मूळ नावाची एक वनस्पतीयावर गुणकारी आहे. त्याच प्रमाणे बृहत वात चिंतामणी, हृदयार्णवरस, सुवर्ण सूत शेखर, या औषधी हृदयरोगावर गुणकारी आहेत, त्याच प्रमाणे अभ्रकभस्म, मृगशृंगभस्म, अशाकाही भस्माचा उल्लेख केलेला आहे. मात्र हा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu