लोणचे प्रकार

Pickle Recipes – Pickle is made from various fruits like mango, lemon, cucumber etc., Mango Pickle is one of the delicious and famous recipe. Raw mangoes is used to make...

Pickle Recipes –

Pickle is made from various fruits like mango, lemon, cucumber etc., Mango Pickle is one of the delicious and famous recipe. Raw mangoes is used to make the pickle. Get complete procedure for making the Mango Pickle from Marathi Unlimited.

Mango Pickle –

Pickle Recipes

 

साहित्य –

 • १ किलो कैऱ्या
 • १ वाटी मोहरी डाळ पूड करून
 • लाल भरड ( तिखट)
 • २ चमचे भाजलेल्या मेथी  दाण्याची पूड
 • २ चमचे हळद पूड
 • थोडे हिंग
 • साधारण चवी नुसार मीठ
 • चिमटीभर खाण्याचा चुना
 • १ चमचा भाजलेल्या बडिशेपची पूड
 • २ वाटी तेल.

कृती –

प्रथम तेल गरम करून घ्यावे त्यात हळद, हिंग, मेथीपूड घालून फोडणी करून तेल थंड करून घ्यावे, कैऱ्यांच्या फोडी करून स्व्च्छ करून कोरड्या करुन  घ्याव्या. त्याला लाल तिखट, मीठ, बडीशेप  फोडणी करून गार झालेले तेल चांगले चोळून घ्यावे. ते मिश्रण बरणीत भरून ठेवावे त्यात थोडा खाण्याचा चुना घालावा व उरलेले तेल वरून ओतावे, लोणचे चांगले हलवून एकत्रित करून घ्यावे.

Red Chili Pickle –

Pickle Recipes

 

साहित्य –

 • अर्धा किलो ओल्या लाल मिरच्या
 • ५० ग्राम धने
 • १ चमचा मेथीदाणे (भाजून )
 • २ चमचा   मोहरी डाळ
 • मीठ
 • हळद पूड
 • हिंग
 • बडीशेप १ चमचा
 • कलौंजी
 • तेल.

कृती – 

मिरच्या धुवून, पुसून कोरड्या करून घ्याव्या, बडीशेप, कलौंजी, मेथीदाणे, धने, मोहरी डाळ कमी तेलात परतून पूड करून घ्यावी, या पूडमध्ये मीठ, हळद, हिंग एकत्रित करून हा मसाला चिरा दिलेल्या मिरचीत दाबून भरावा.  वरून थोडे व्हिनेगार घालावे. बाकी तेल गरम करून गार करून घ्यावे. मसाला भरलेल्या मिरच्या बरणीत भरून  त्यावर गार केलेले तेल ओतावे . बरणी ४ ते ५ दिवस उन्हात ठेवावी.

Lemon Pickle –

Pickle Recipes

 

साहित्य –

 • ५००ग्राम पिवळे रसदार मोठ्या आकाराची लिंबू
 • १०० ग्राम साखर
 • १०० ग्राम लालसर भाजून घेऊन जिरे पावडर
 • लाल तिखट
 • हिंग
 • मीठ

 कृती –

लिंबे पाण्यातून धुवून कोरडे पुसून घ्यावी, एका लिंबाच्या साधारण आठ फोडी कराव्या, ( स्टीलच्या सुरीने )  वरील सर्व जिन्नस त्या फोडींत घालून चांगल्या मिक्स करून  त्या फोडी बरणीत भरून घ्याच्या , बरणीच्या तोंडाला पातळ व स्व्च्छ सुती कापड बांधावा व बरणी ६ ते ७ दिवस कडक उन्हात ठेवावी, नंतर उन्हातून काढून झाकण लावून थंड जागी ठेवावी. हे लोणचे उपवासालाही चालते.

 

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
21