उन्हाळ्यातील चविष्ट शीतपेय




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Tasty and Healthy Coldrinks for Summer – Here is the recipe for tasty, healthy and natural coldrinks and juices especially for the summer season. Natural juices and coldrinks are far better than artificial coldrinks. It not only help to get some relaxation from heat , also provide vitamins and minerals to our body.

Tasty healthy fruit juices
फळांमधून शरीराला व्हिटामिन्स  मिळतात. फळांच्या रसात आणखी काही घटक पदार्थ घालून त्याची चव जास्त वाढविता येते, शरिरात ताकत राहते व हे सर्व रस प्यायल्यामुळे कातडीच्या रोगांपासून बचाव होतो. उन्हाळंयात निरनिराळ्या चवींची नवीन व स्वादिष्ट पेये हवीहवीशी वाटतात.

* टोमाटो व काकडी :

साहित्य -: तीन कप टोमाटोचा ज्यूस, दोन चमचे लिंबाचा रस, दोन लवंगा, एक दालचिनी काडी, एक लहान कांदा किसून, अर्धा कप काकडीचा कीस, चवीपुरते मीठ, तीन चमचे साखर व बर्फाचे क्युब्ज.

कृती -: कांदा व काकडी किसून घ्यावी, बर्फ सोडून सर्व घटक पदार्थ एकत्र करून फ्रीजमध्ये एक तासभर ठेवावेंत व  नंतर गाळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून, प्रत्येक ग्लासात घालून बर्फाचे क्युब्ज घालावे  व सर्व्ह करावे.

* कलिंगडचे सरबत :

साहित्य -: एक कलिंगड, चवीपुरते मीठ, दालचिनी/ मिरपूड , साखर एका लिंबाचा रस.

कृती -: कलिंगड कापून त्याच्या लालबुंद, मधल्या भागातील गर स्कुपने ( गोल आकाराचा चमचा आईस्क्रीम काढण्याचा ) काढून एका बाउलमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवावे आणि मग उरलेल्या कलिंगडचा लाल भाग अगदी बारीक चिरून त्याच्या बिया काढून, त्याचा रस काढून तो गाळून घ्यावा.  त्यात मीठ, साखर, दालचिनी पूड किंवा मिरपूड, लिंबाचा रस घालून तासभर फ्रीज मध्ये ठेऊन थंड करावे. सर्व्ह करतेवेळी प्रत्येक ग्लासात थंड सरबत काढून ठेवलेल्या कलिंगडच्या तुकड्यातील एक दोन तुकडे त्या सरबतात घालून प्यायला द्यावे. या सरबतात बर्फाचे क्यूब्ज घालू नये.

*  सफरचंदाचे पेय :

साहित्य -: २५० ग्राम सफरचंद, चवीपुरती साखर, एक लिंबू, मीठ.

कृती -: सफरचंद स्वच्छ धुवून सालासकट बारीक चिरून घ्यावी. साखरेवर लिंबाची साल किसून घ्यावी व ती सफरचंदात मिसळावी. तीन कप उकळीचे पाणी त्यात ओतावे व झाकण घालून ठेवावे. थंड झाल्यावर गाळून घ्यावे. चवीपुरती साखर घालावी. मीठ रुचीप्रमाणे घालावे किंवा नाही घातले तरी चालेल.  सर्व्ह करण्यापूर्वी चांगले ढवळून बर्फ घालून लहान लहान ग्लासातून सर्व्ह करावे.

* जिंजरेल :

साहित्य-: एक किलो प्रत्येकी बेताच्या आकाराचा एक कप आल्याचा रस व लिंबाचा रस, त्याच कपाने मोजून चार कप पाणी.

कृती -: साखर व पाणी एकत्रित करून साखर पाण्यात चांगली मिसळू द्यावी. ते पानी पाच ते सात मिनिटे उकळावे. गार झाल्यावर आल्याचा रस व लिंबाचा रस गाळून व्यवस्थित  मिसळावा. हे टिकाऊ करण्यासाठी दोन चमचे पाण्यात अर्धा चमचा पोटेशियम मेटाबायसल्फाईड गाळून ते मिश्रण त्या रसात मिसळावे. सर्व्ह करताना उंच ग्लासमध्ये दोन चमचे करड बर्फ व थोडा जिंजरेल सोडा किंवा पाणी गाळून द्यावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu