मनुष्य जीवनाचा उद्देश समजून घ्यावा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

The Real Purpose Of Human Life, The Bhagavad-gita gives complete scientific information on the subject So the purpose of the human life is to understand our spiritual nature

human 12
सकाळी सूर्योदय होताच आयुष्याच्या एका नवीन दिवसाला सुरवात होते. आणि सूर्यास्त होतो तसा दिवस समाप्त होतो. अश्या प्रकारे रोज एक दिवस आयुष्यातून कमी होतो. आपल्या जन्मापासूनच आयुष्याची घट चालू होत असते. परंतु अनेक प्रकारच्या कामामुळे व वाढलेल्या विभिन्न कार्यक्रमात गुंतल्यामुळे या जाणाऱ्यां वेळेचे भानच राहात नाही. असे क्षण बहुतेक येतात जेव्हा मनुष्याचा जन्म, म्हातारपण, संकटे, आजारपण व मरणा विषयक दु:खद विचार करायला लावणारे दृश्य समोर येत असतात परंतु मनुष्य किती मदांध, कामनाग्रस्त व अविवेकी आहे की तो सर्व काही पाहून सुद्धा आंधळाच बनून असतो. मोह व प्रपंच्यात गुंग असणारा मनुष्य एकांतात बसून ईतका सुद्धा विचार करीत नाही. की या मानवी शरीरामध्ये जन्म घेण्याचा आपला उद्देश काय आहे? आपण कोण आहोत? कोठून आलो ? आणि कोठे जाणार आहोत ?

सृष्टी प्रवाहाच्या अनाकलनीय परंपरेमध्ये प्रवाहित मनुष्य जगातील सुखांना, इंद्रिय भोगांना,पदार्थाच्या स्वामित्वाला, पैसा, पुत्र, व विविध कर्मांना जीवनाचे ध्येय बनवून एक बहुमुल्य संधी गमावून बसतो. शेवटी जेव्हा मृत्यू समोर येतो आणि या जगाचा निरोप घेतांना डोक्यावर पायांचे व दुषकर्माचे भयंकर ओझे चढलेले पाहतो तेव्हा मोठा पश्चात्ताप ग्लानी व आंतरिक अशांती मनात उत्पन्न होते. एकदा भाव ठरल्या नंतर किंमत लावण्यात काय फायदा? विशाल वैभव, अपार धन-धान्यांची राशी, मुले-नातू-पणतू कोणीही अश्या वेळी साथ देत नाही हे संपूर्ण जग त्यावेळी उपयोगाचे नसतात. व हे जीवनभर सजविलेले शरीर सुद्धा साथ देत नसतात. फक्त चांगल्या-वाईट संस्काराचे ओझे लादलेला जीव अनिच्छेने या जगातून बाहेर पडतो, त्यावेळी त्याला किती कष्ट होत असेल? हे काय समजू शकेल. मनुष्य जीवनातील हि जी विस्मृती आहे. ती सर्व कुसंगती मुळेच आहे. ज्ञानाचा आदर केल्याने आपल्या आतून प्रश्न उठतील.

आपण काय आहोत? आपण काय करायला नको ? आणि याचे ज्ञान आपल्या आंत आहे. परंतु आपण आपल्या जीवनाचा काही योग्य दृष्टीकोन न बनविल्यामुळे ती ज्ञानशक्ती अस्ताव्यस्त व व्यर्थ पडलेली आहे. मनुष्याचा प्रथम पुरुषार्थ आहे-जीवनातील ध्येयामध्ये चूक न होवू देणे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कर्तव्याचे योग्य व सम्यक ज्ञान आपणाला असेल. कर्तव्याचे विस्मरण त्याने स्वत:च केले आहे. पण जेव्हा त्याला मनापासून काही करायचे असेल तर तेव्हा मात्र त्याचे ईतरांच्या गरजांकडे दुर्लक्ष असते आणि फक्त स्वत:चा फायदा काय आहे ? पण स्वत:फायद्या पेक्षा दुसऱ्याच्या फायद्याचा विचार केला गेला तर, स्वत:चे कर्तव्य व अकर्तव्याच्या ज्ञानावर त्याचा उदय व पतन अवलंबून असतो. व्यवहारिक जीवनात सर्वांनाच उंच जाण्याची आकांक्षा असते. प्रत्येक मनुष्य स्वत:ला श्रेष्ठ करू ईच्छि तो. श्रेष्ठ बनणे माणसाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. परंतु कोणाला विचारले असतां. कि काय त्याने या गंभीर प्रश्नावर खोलवर विचार केलेला आहे? या पूर्वी हा विचार कधी केला होता? या ईच्छा पुरती साठी त्याने कोणती योजना बनविली आहे ? बहुतेक लोक या गूढ प्रश्नाच्या गहनतेला समजू शकणार नाहीत. तशी गोष्ट एकदम सरळ व सोपी आहे. महाणता मनुष्याच्या आंत लपलेली आहे. आणि ती व्यक्त होण्याचा मार्ग शोधत आहे. परंतु प्रपंच्यात गुंतलेला मनुष्य त्या आत्मप्रेरणेला विसरू ईच्छीतो. त्याला लाथाडू ईच्छितो अपमानित झालेला आत्मा मुकाट्याने शरीरात सुप्त पडलेला आहे. आणि मनुष्य फत पडलेल्या विटंबनेच्या प्रपंच्यात पडून राहतो.

शारीरिक दृष्टीने मनुष्य कितीही बलवान असो बौद्धिक दृष्टीने तो कितीही तर्कशील असो धर्माचा कितीही भंडार त्याच्या जवळ असो परंतु आत्मसंपदेच्या अभावी तो मणिविहीन सर्पाप्रमाणे अर्धविकसितच म्हटला जाईल. आत्मबल प्राप्तीचे एक सुख, जगातील करोडो सुखांपेक्षा मोठे असते. आत्मिक संपदा असणाऱ्या व्यक्ती नेतृत्व करतात, मार्गदर्शन करतात तो कितीही निर्धन, फकीर असून सुद्धा मोठमोठ्या बंगल्यात राहणारे धनाढ्य शेठ त्याच्या पायावर पडून त्याला दयेची भिक मागतात. या वरून हे सिद्ध होते कि मनुष्याची महानता हि बाह्य नसून आंतरिक आहे. भौतिक संपदा तुच्छ आहे.

 

 

 

 

 

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu