नागपूर जिल्हा (Nagpur City)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

About Nagpur City, A wonderful place in Center of India. Read Complete Information about Nagpur City, Population, Geographical Area and Many More. Get complete information about Nagpur City and Nearby cities.

नागपूर जिल्हा (Nagpur City)

नागपूर जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नागपूर
लोकसंख्येची घनता – ४७०
स्थान – पूर्व महाराष्ट्र, विदर्भात मध्य प्रदेश राज्यालगत
लोकसंख्या – ४६,५३,५७०
साक्षरता – ८८.३९
अनुसूचित जाती – ८,६७,७१३
अनुसूचित जमाती – ४,३७,५७१
क्षेत्रफळ – ९,८९२ चो. कि.मी.

“नागपूर” गोंड राजा बक्त बुलन्द्शाह यांनी हे शहर वसविले. नाग नदीच्या काठी असलेल्या शहरास या नदीच्या नावावरूनच “नागपूर” हे नाव पडलेले आहे. मराठा राजवटीत हे शहर भोसल्यांच्या राजधानीचे शहर होते. भोसल्यांच्याच राजवटीत या शहराचा व जिल्ह्याचा विकास घडून आला आहे. इ.स.१८१७ मधील सीताबर्डी च्या युद्धात भोसल्यांचा पराभव करून इंग्रजांनी नागपुरात आपले वर्चस्व प्रस्तापित केले. इ.स. १८५३ मध्ये भोसले घराण्याचा ह्रास झाल्यानंतर येथे इंग्रजांचा प्रत्यक्ष अंमल सुरु झाला. ब्रिटीश काळात मध्य प्रांत व वर्हाड यांची राजधानी नागपूर येथेच होती. स्वातंत्र्यानंतर हे शहर तत्कालीन मध्य प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर बनले. इ.स. १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनंतर हा जिल्हा तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आला. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर हा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला. नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचा दर्जा मिळाला.
प्रभू रामचंद्राच्या व महाकवी कालिदासाच्या वास्तव्याने हा जिल्हा पुनीत झाला आहे. नागपूर पासून ४८ कि.मी. अंतरावर रामटेक हे ठिकाण आहे. येथे रामाने काही काळ वास्तव्य केले होते. महाकवी कालीदासने आपले “मेघदूत” हे काव्य इथेच लिहिले आहे. त्यामुळे इथेच महाकवी कालिदासाचे स्मारक उभारले असून संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसार्थ ‘ कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय ‘ स्थापन करण्यात आले आहे.

स्थान

नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस भंडारा जिल्हा, दक्षिणेस चन्द्रोउर जिल्हा, नैहृतेस च पश्चिमेस वर्धा जिल्हा, वायव्येस अमरावती जिल्हा आणि उत्तरेस मध्य प्रदेश राज्य असे स्थान नागपूर जिल्ह्याला लाभलेले आहे.
नागपूर जिल्ह्यातील तालुके
१) नागपूर शहर २) नागपूर ग्रामीण ३) हिंगणा ४) कामठी ५) काटोल ६) नरखेड ७) सावनेर
८) कळमेश्वर ९) रामटेक १०) परशुइवनि ११) मौदा १२) उमरेड १३) भिवापूर १४) कुही. असे एकूण चौदा तालुके नागपूर जिल्ह्यात येतात.

“नागपूर” हे नागपूर विद्यापीठाचे (आताचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) मुख्य ठिकाण आहे. इ. स. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठास जवळजवळ ८२ वर्षाची शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे.

नागपूर जिल्ह्याची प्राकृतिक रचना –

मध्य व पूर्वेकडील मैदानी प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश व पश्चिमेकडिल डोंगराळ प्रदेश अशी नागपूर जिल्ह्याची सर्वसाधारण प्राकृतिक रचना आहे. नागपूर जिल्ह्याच्या ईशान्य भागात उत्तर – दक्षिण अशी वाहणारी पेंच नदी हि मध्य प्रदेश राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करते. नंतर कामठी जवळ हि नदी कन्हान नदीस मिळते. पेंच आणि कन्हान नदीच्या संगमा आधी कोल्हार नदी कन्हान नदीला येउन मिळते. भिवकुंड टेकडी जवळ नाग नदी कन्हान नदीस येउन मिळते. नंतर पुढे संड नदीही कन्हान नदीस येउन मिळते.
कोल्हार, पेंच, चंद्रभागा, संड च नाग आणि अजून काही चोरट्या नद्यांना आपल्या पोटात घालून वाहणारा कन्हाननचा विस्तृत प्रवाह पुढे भंडारा जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे वैनगनगेस मिळते.
वर्धा नदी हि जिल्ह्याच्या नरखेड तलिक्यच्य वायव्य सीमेवरून वाहते. जांब व कर ह्या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. जांब नदीचा बहुतांश प्रवास हा काटोल व नरखेड तालुक्यांतून होतो. हि नदी पुढे जालालखेद्याजवळ वर्धा नदीला येउन मिळते. काटोल हे ठिकाण जांब नदीकाठी वसलेले आहे. वर्धा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी कर नदी खरगद्जवल वर्धा नदीस येउन मिळते. वैनगंगा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते. ती आपल्या प्रवासात काही काळापर्यंत नागपूर व भंडारा जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमेचे कार्य पार पाडते. वेणा नदी माहदगद टेकड्यांमध्ये उगम पावते व दक्षिणेकडे वाहत जाऊन पुढे वर्धा जिल्ह्यात प्रवेश करते.

नागपूर जिल्ह्यातील धरणे –

पेंच नदीवर पारशिवनी तालुक्यात धारण बांधण्यात आले आहे. हा नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.पेंच प्रकल्प हा मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने राबविला जात आहे. सूर नदीवर रामटेक येथे धारण बांधण्यात आलेला रामसागर तलाव तसेच वेणा नदीवर व्याहाड येथे बांधण्यात आलेले धारण जलसिनचानाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
कान्हेलीपाला ( तालुका हिंगणा ), चंद्रभागा ( तालुका काटोल ), पांढराबोडी ( काळमनी, तालुका उमरेड), मकरधोकडा ( तालुका उमरेड), उमरी नाला ( उमरी, सावनेर ), खेकर नाला ( राजेवाडी, सावनेर ), कोलार नदी ( जुनेवाडी, सावनेर ), मोरधान ( लिंगा, सावनेर ), जाल नदी ( काटोल ) व हिरवी नाला ( उमरेड ). हे नागपूर जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प आहेत.

नागपूर जिल्ह्यातील महत्वाची पिके –

ज्वारी, गहू, तांदूळ, तूर, भुईमुंग व तीळ हि जिल्ह्यातील महत्वाची अन्नधान्य पिके आहेत. ज्वारीचे पिक हे खरीप व रब्बी अशा दोन्ही प्रकारच्या मोसमात घेतले जाते. मात्र अलीकडच्या काळात सोयाबीनचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. कापूस हे जिल्ह्यातील महत्वाचे व्यापारी पिक आहे. तसे तर नागपूर जिल्हा हा संतरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. संतरा हा प्रमुख बागायती पिक आहे. नरखेड, काटोल व कळमेश्वर हे तालुके संताऱ्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

खनिजे –

खनिज संपत्तीचा विचार केला तर नागपूर जिल्हा हा फारच समृद्ध आहे. उमरेड, सील्लेवाडा, कामठी, पाटणसावंगी, व सावनेर परिसरात दगडी कोळश्याच्या खाणी आहेत. सावनेर ते कन्हान या परिसरात दगडी कोलस्यचे फार मोठ्या प्रमाणात साठे आढळून आले आहेत. नागपूर जवळ असलेले वोखारा या भागातही दगडी कोलस्यचे साठे आढळून आले आहेत. उमरेड परिसरात आढळणारा कोळसा हा अति उच्च प्रतीचा मनाला जातो.
पोलाद तयार करण्यासाठी लोह-खनिजबरोबर म्यागनिजाचाही वापर केला जातो. कांद्री, मानसल, रामडोंगरी, कोरेगाव, गुमगाव, पारशिवनी, खप या परिसरात म्यागनिजचे साठे विपुल प्रमाणात आहेत. सावनेर ते रामटेक हा भाग म्यगनिज च्या उत्पादनासाठी अतिशय महत्वाचा आहे.
भिवापूर तालुक्यात भिवापूर तालुक्यात लोहखनिज सापडते. या परिसरातील खडकात लोह्यच अंश सुमारे आठ टक्के इतका प्रचंड आहे. सावनेर, पारशिवनी व रामटेक या परिसरात चूनखडकाचे साठे प्रचंड प्रमाणात आहेत. कोद्रीजवळ पोटगवारी व देवलापार येथे सापडणारा चूनखडक उच्च प्रतीचा मनाला जातो.
अभ्रक व टंगस्टन हि खनिजे हि नागपूर जिल्ह्यात अल्प प्रमाणात आढळून येतात. कन्हान नदीतील रेती बांधकामासाठी फार उपुयुक्त आहे.

Historical Background of Nagpur City, Nagpur is the winter capital of the state of Maharashtra, a fast growing metropolis and third … In addition, the city also derives political importance

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu