मंगलाष्टक …वन्स मोर

mangalashtk oms more

स्वप्नील आणि मुक्ता या लोकांच्या प्रचंड आवडत्या जोडीचा सिनेमा ‘मंगलाष्टक वन्स मोर’ आज २२ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधून लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेली स्वप्नील मुक्ताची जोडी पुन्हा एकदा आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. ही एक सुंदर अशी प्रेमकथा असणार आहे, ज्यामध्ये खूप वेगळ्या आवडीनिवडी असलेले दोन प्रेमी जीव एकत्र येतात आणि एकमेकात ते सामावून जातात. या दोघांबरोबरच या सिनेमात सई ताम्हणकर, कादंबरी कदम, हेमंत ढोमे आणि विजय पटवर्धन यांच्या सुद्धा भूमिका आहेत. समीर जोशी यांची कथा असलेला हा सिनेमा श्री आद्य फिल्म्स यांची निर्मिती असणार आहे.
दाक्षिणात्य चित्रपटात आघाडीची नायिका असलेल्या रेणू देसाई यांची निर्मिती असलेल्या ‘मंगलाष्टक वन्स मोर’ या सिनेमाला निलेश मोहरीर यांनी संगीत दिलं आहे.  तर अवधूत गुप्ते ,स्वप्नील बांदोडकर ,बेला शेंडे ,वैशाली सामंत ,मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार ,अभिजित सावंत यांनी स्वरसाज दिलेला आहे. आजच्या अत्यंत धकाधकीच्या आयुष्यात नात्यांचे बदलणारे भावविश्व त्याचा कळत ,नकळत होणारा परिणाम अशा पैलूंवर या सिनेमाद्वारा भाष्य केले आहे.

Gallery: