रेसिपी – झटपट ढोकळा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Khaman dhokla  is a savory steamed cake made from gram flour. khaman is soft and fluffy, mildly tangy-sweet and a great snack anytime of the day. this is also an instant khaman dhokla recipe. Here you will find the recipe to prepare instant dhokla i.e jhatpat dhokala.

jhatpat dhokla

साहित्य -: एक ग्लास बेसन, इनो पावडर अर्धा चमचा, दोन लिंबाचा रस, मोहरी एक चमचा, एक पळी तेल, एक तुकडा आले, तीन हिरव्या मिरचीचे  उभे काप केलेली, कोथिंबीर बारीक कापून अर्धी वाटी, चवी नुसार मीठ.

कृती-: बेसन घेऊन त्यात लिंब रस, ईनो पावडर, चवी नुसार मीठ घालून भिजविणे. {जास्त घट्ट नाही व अती पातळ नाही} त्याला साधारण फेटावे. य़ाप्रमाणे  मिश्रण तयार करून घ्यावे.  थोडा वेळ तसेच ठेवावे. नंतर पसरट व थोडे खोल असलेले ताट घेऊन त्याला तेल लाऊन ते मिश्रण त्यात सारखे करून टाकावे.  कुकर मध्ये पाणी घालावे. बुडाशी एखादी कुकर मधील जाळी किंवा प्लेट ठेवावी जेणे करून बुडातील पाणी बेसन मिश्रणाच्या ताटात जाणार नाही. एवढेच पाणी घालावे. कुकर मंद आचेवर मांडावे व त्यात बेसन मिश्रणाचे ताट आत व्यवस्थित ठेवावे . [घसरणार नाही याची खात्री करून घ्यावी] २५ ते ३० मिनिटे ठेवावे. त्यानंतर कुकर उघडून वाफ काढून ढोकळा शिजला किंवा नाही बघन्या करीता सुरीने त्याला थोडा काप देऊन बघावे सुरीला चिकटून ढोकळा येत असेल तर थोडा कच्चा आहे असे समजावे. सुरीला चिकटला नाही तर संपूर्ण शिजला असे समजावे. [शिजला नसेल तर थोडा वेळ शिजू द्यावे] थंड झाल्यांनतर त्याचा संपूर्ण घेर ताटापासून सुरीने मोकळा करून घ्यावा. दुसर्या प्लेट मध्ये त्याला पालथा करून घ्यावा व साधारण आकाराचे चौकोनी काप द्यावे.  त्यानंतर मंद आचेवर छोट्या भांड्यात दोन चमचे  तेल चांगले गरम करून त्यात  मोहरी, मिरचीचे काप व आल्याची पेष्ट घालून फोडणी करून घ्यावी. त्यात थोडे अर्धी वाटी पाणी घालून ते संपूर्ण ढोकळ्या वर चमचाने घालावे, [पाण्याने ते सुटे होतात] नंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरउन घ्यावी. आपला ढोकळा तयार. प्लेट मध्ये सॉस सोबत खाण्यास द्यावे .

Recipe : Jhatpat Dhokala
ingredients; Dal, Rice, En, Lemon Juice etc
Read full recipes tips here.
Jhatpat Dhokala | Instant Dhokala.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu