बटाट्याची जिलेबी

Potato Jalebi :

Jalebi is a hot favourite on any special occasion be it a birthday, wedding or festival. This is a quick and easy recipe made with boiled potatoes. lemon juice is added for the better taste of jalebi. It is one of favorite sweet in maharashtra.

Awadhi_jalebi recipe

साहित्य -: २५० ग्राम बटाटे, चार चमचे मैदा. २५० ग्राम साखर, एक लिंबाचा रस, चिमुटभर केशर, थोडा रंग, तूप. कृती -: बटाटे उकडून सोलून गरम असतानाच किसून घ्यावे. त्यात थोडा मैदा मिसळावा.त्यात थोडे पाणी टाकून भज्याच्या पीठापेक्षा घट्ट भिजवावे. त्यानंतर साखरेत थोडे पाणी घालून एकतारी पाक तयार करावा. त्यात लिंबाचा रस व केशर घालावे.

कढईत तूप टाकून गरम करायला ठेवावे. नंतर पिठात (किंचित पाण्यात रंग एकजीव करून) मिसळून सारखे करावे. पीठ चांगले घोटावे. व जिलबी करायच्या कापडात किंवा जिलेबी पिळण्या करीता प्लास्टिकची बॉटल मिळते त्यात पीठ भरावे. व सावकाश गरम तुपात जिलब्या पिलाव्यात व त्यातच कात्रीने वेगवेगळ्या करून घ्याव्या. एकाबाजूने तळ्ल्या कि पलटाव्या व दुसर्या बाजूने तळून घ्याव्या. झाल्या की लगेचच पाकात टाकाव्या. व दुसरा घाणा होईस्तोवर ठेवाव्या नंतर पहिल्या काढून दुसऱ्या घाण्यातील तळ्ल्या  टाकाव्या.या प्रमाणे संपूर्ण जिलब्या कराव्यात.

Recipes tips on Potato Jalebi, read about ingredients required of making Potato Jalebi.