भगंदर – मुळव्याध

गुद विकारामध्ये मुळव्याध व भगंदराचे रुग्ण बरेच असतात, यापैकी भगंदर हा जुनाट आजार असून, यामध्ये दुषितमांस व रक्ताची नाडी तयार झालेली असते त्यात सतत पु किंवा पाणी पाझरत राहते. याची...

mulvyadhjahirat-dhyaगुद विकारामध्ये मुळव्याध व भगंदराचे रुग्ण बरेच असतात, यापैकी भगंदर हा जुनाट आजार असून, यामध्ये दुषितमांस व रक्ताची नाडी तयार झालेली असते त्यात सतत पु किंवा पाणी पाझरत राहते. याची सुरवात एक भगंदर पिड्केपासून तयार होते. प्रथम गुदद्वाराच्या बाजूला एक पिडका उत्पन्न होतो. काही दिवसांनी ती पिकून फुटते व त्यातून पू सर्वत राहतो. काही काळ लोटला कि स्त्राव आपोआप बंद होतो. व पेशंटला बऱ्यापैकी आराम होतो पण पुन्हा काही दिवसांनी त्याच ठिकाणी पिड्का होते व परत फुटते व स्त्राव चालू होतो याप्रमाणे दुष्ट चक्र वर्षानुवर्षे चालूच असते व आजार वाढत जातो यावर औषध चिकित्सेने काहीच फरक पडत नाही परंतु ऑपरेशन चिकित्सेने भगंदर नाडी काढून टाकल्या नंतरही हा पुन्हा होतो. अशा या खोडकर आजाराने रुग्ण त्रासून जातो.

होण्याचे कारण

१) अग्नी माद्य, दुषित माससेवन, अती मद्यपान.

२) घोड्यावरून किंवा ईतर वाहनातून सतत प्रवास, सतत कठीण आसनावर बसने.

३) गुदग्रंथी कृमी दुषित झाल्यामुळे

लक्षणे: 1) गुदद्वाराच्या बाजूला पुन्हा पुन्हा सूज येणे,  २) गुदद्वारातून किंवा बाजूने पस किंवा लसिकायुक्त स्राव सतत वाहने ३) गुदात किंवा आजूबाजूच्या भागात वेदना होणे.

४)गुदाला खाज येणे

५) शौचास साफ न होणे

६) फारच अशक्तपणा असणे.

*   प्रकार व लक्षणे :

* शतपोनक ( Shatpnak ) — हा वातज प्रकार असून या मध्ये प्रथम गुदद्वाराच्या बाजूला शाव किंवा अरुण वर्णाची पिड्का तयार होते. त्यामध्ये सुई ने टोचल्या प्रमाणे किवा कात्रीने कापल्याप्रमाणे वेदना होतात या पिड्केची योग्य चिकित्सा न केल्यास ती पिकून फुटते. व गुदद्वाराच्या आजूबाजूला अनेक छिद्रयुक्त, तेवढ्याच नाड्या असलेला भगंदर होतो, म्हणून या भगंदराला शतपोनक असे नाव देण्यात आले, या भगंदराच्या नाडयानमधून पाण्यासारखा स्त्राव पाझरत राहतो.

*  उष्ट्रग्रीव ( Ustagriv )— पित्तज दृष्टीमुळे गुदाच्या बाजूला उंच उठवडा असलेली उंटाच्या माने सारखी लालसर वर्णाची, बारीकशी, स्पर्शाला उष्ण असलेली पिड्का होते याची उपेक्षा केल्याने ती पिकते, व आपोआप फुटते व त्यातून दुर्गंधीत रक्तपस मिश्रित उष्ण स्त्राव वाहतो, यामध्ये अग्निदाह वेदना होतात.

*  परीस्त्रावी (Paristravi )— हा कफ दृष्टीमुळे होणारा भगंदर आहे. प्रथम श्वेत वर्णाची व स्पर्शास कठीण, मूळ फार खोलवर असलेली पिड्का  तयार होते, काही दिवसांनी पिकून फुटते व त्यातून चिकट व घट्ट येतो. या प्रकारात खाज हे विशेष लक्षण असते. त्यामानाने वेदना फार कमी असतात.

*  श्म्बुकावर्त ( Shambukavtr )— तिन्ही दोष्यांच्या दृष्टीमुळे गुदाच्या बाजूला पायाच्या अंगठ्या एवढी अनेक प्रकारच्या वर्णाची, नानाविध वेदनायुक्त पिड्का उत्पन्न होते. ती फुटल्या नंतर त्यातून काळसर, पिवळसर किंवा रक्तमिश्रित स्त्राव मोठ्या प्रमाणात सतत वाहतो या प्रकारात भगंदर नाडीचा मार्ग शंखाच्या आर्वताप्रमाणे असतो.म्हणून याला श्म्बुकार्वत असे म्हणतात. यात वेदना भयंकर असतात जेवणाची इच्छया न होणे, भरपूर तहान लागने,अंगात दाह, ताप व उलटी येणे आदि लक्षणे सुद्धा आढळतात.

* उन्मागी ( Unmagi )— हा आगंतुक प्रकार असून गुदाला बाहेरून इजा झाल्याने, किंवा मांस खातअसताना चुकून हाडाचा तुकडा गिळला गेल्यास तो तुकडा गुदद्वारात पोहचून गुदास इजा पोहचवतो, त्यामुळे व्रण उत्पन्न होऊन तेथील मास सडून तेथे कृमी उत्पन्न होतात या कृमी भक्षणात आजूबाजूची जागा फाटून वेडीवाकडी गती (मार्ग ) असलेला भगंदर होतो. यातून अतिशय दुर्ग्नंधीत पस वाहत राहतो.

*  घरघुती उपाय (Home Treatment)— १) पिडीत रुग्णांनी अधून मधुन सौम्य रेचक, औषध घेत जावे व आपला कोठा शुद्धा करून घ्यावा. त्यासाठी इसबगोल, त्रिफळा, स्वादिष्ट विरेचन, गंधर्व हरितकी, पंचसकार चूर्ण, यापैकी कुठल्याही एका योगाचे दोन चमचे चूर्ण रात्री झोपताना कोमट  पाण्यासोबत घ्यावे. २) गुग्गुळ कल्पाच्या गोळ्या ( चांगल्या कंपनीच्या ) दिवसातून २-२ अश्या तीन वेळा जेवना नंतर पंधरा ते तीस दिवस घ्याव्या. ३) निंबपत्र टाकून गरम केलेल्या पाण्यात अर्धा तास नियमित बसावे. व्रण त्रिफळा काढयाने धुवून स्व्च्छ करावा, त्यानंतर शोधन किंवा मुरीवन्ना तेलात भिजवलेला कापसाचा पिच्चु ठेवावा.jahirat-dhya

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
17