वृक्षवल्ली




Like
Like Love Haha Wow Sad Angry
458165

Vrikshvlli: trees are national property: trees are very important part of us. they gives us many benefits to us. for burning , energy resource, decoration we use trees. they provide us oxygen.

wrikshavalli amha syare

जे त्यागाच्या भावनेने स्वत:उन्हात राह्तात, पण ईतरांना सावली देतात. ज्यांची फळे-फुलेही दुसर्यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सतपुरुषासारखे भासतात. या वृक्षरुपी सतपुरुषांचे सान्निध्य आबालवृद्धांना, सामान्यजणांना व त्याच बरोबर अलौकिक विभूतीन्नाही लाभावे असे वाटते. म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन, अध्यापन आणि तपश्चर्या करीत असत. निसर्गातील गुढ उकलण्याचा प्रयत्न करीत असत. श्रीरामासारख्या युगपुरुषाने चौदा वर्षे वन-उपवनाच्या सानिध्यात घालविली सीतेच्या अपहर्णा नंतर लतावृक्षांना सीतेच्या शोधात सहभागी केले. त्यांनी कळकळी ने विचारले कि, ” पाहिली काय वृक्षांनो, तन्वंगी माझी सीता? देखिली काय वेलींनो,शालीन धरेची दुहिता ?”

साहित्यिकांच्या जीवनात आणि साहित्यात निसर्ग एक अविभाज्य भाग झाला आहे. तो सावलीसारखा त्यांच्या सोबत वावरत असतो. संत काव्यात तर पानापानावर वृक्षवेलींच्या उपमा व दृष्टांत दिसतात. तुकाराम महाराज म्हणतात. “वृक्षवल्ली आम्हां सोयरी ” व इंदिरा संत म्हणतात. “जरी वेधिले चार भिंतींनी, या वृक्षांनी मजला संगत. “सामान्य मानुसही” नेहमीच्या त्रासापासून, विचारापासून दूर आरोग्यासाठी, हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातच जातो.

अशा या उपकार कर्त्या वृक्षांचा आज ऱ्हांस होत आहे. एकूण भू-भागापैकी एक तृतीयांश वृक्षराजांनी व्यापलेली असली पाहिजे.  तरच निसर्गाचा समतोल राहातो. भारतात हे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे एक पंचमांस ईतके आहे. हिमालयाची उतरंड मध्यप्रदेश, आसाम, ओरिसा आणि बंगालच्या मुखा जवळील प्रदेश येथेच फक्त घनदाट जंगले उरलेली आहे. बाकी ठिकाणी मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत. म्हणतात “मानवाचे पाउल तेथे वाळवंटाची चाहूल अशी म्हण आहे. जो पर्यंत मानवी वस्ती कमी होती, तो पर्यंत वृक्षवल्ली जास्त होती. जसजशी लोकवस्ती वाढू लागली तसतशी जास्तीत जास्त जमीन शेतीखाली जाऊ लागली, जळनासाठी आणि घरे बांधण्यासाठी वृक्षांची बेसुमार तोड होवू लागली. त्यामुळे उष्णता वाढली व पावसाचे प्रमाण कमी होऊ लाग्ले.  जमिनीची घुप होवून ती नापीक होवू झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. हवेच्या प्रदुषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागले.

आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्व दिले होते. ते तुळशी, वड, औदुंबर, पिंपळ यांची पूजा करीत असत. त्यांनी तुलस, बेल, दुर्वा, धोत्रा या आणि अन्य वनस्पतीनां देवतांच्या पूजेत स्थान दिले होते. त्यामुळे या वृक्षांची आपोआप जपणूक होत असे व त्यांच्या बद्दल कृतज्ञताही व्यक्त होत असे.

जे त्यागाच्या भावनेने स्वत:उन्हात राह्तात, पण ईतरांना सावली देतात. ज्यांची फळे-फुलेही दुसर्यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सतपुरुषासारखे भासतात.या वृक्षरुपी सतपुरुषांचे सान्निध्य आबालवृद्धांना, सामान्यजणांना व त्याच बरोबर अलौकिक विभूतीन्नाही लाभावे असे वाटते. म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन, अध्यापन आणि तपश्चर्या करीत असत. निस्र्गातील्गुध उकलण्याचा प्रयत्न करीत असत. श्रीरामासारख्या युगपुरुषाने चौदा वर्षे वन-उपवनाच्या सानिध्यात घालविली सीतेच्या अपहर्णा नंतर लतावृक्षांना सीतेच्या शोधात सहभागी केले. त्यांनी कळकळी ने विचारले कि, “पहिली काय वृक्षांनो, तन्वंगी माझी सीता? देखिली काय वेलींनो, शालीन धरेची दुहिता ?”.

वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे.ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहोटीस लागणारे धन नाही. ज्ञानेश्वरांनी वर्णन केल्याप्रमाणे “मोगरां फुलला, मोगरा फुलला । फुले वेचिता बहरु कळियांसी आला। ‘मोगऱ्याप्रमाणे पुनर्निमानाची शक्ती असलेल्या संपत्तीचा हा शोध आहें. म्हणूनच सरकारने वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण  मानलेला आहे. मध्यप्रदेश राज्यांतील सहा जिल्ह्यांनी जमीन व गवत व जळाऊ लाकडांच्या लागवडी खाली आणली आहे. सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्ष-संर्वधन व वृक्षसंरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहे.

सर्व सामान्य जनतेलाही यासाठी सहजपणे पण खुपकाही करण्यासारखे आहे.त्यासाठी  वेगळ्या प्रयत्नांची आवश्यकता नाही, पण ईच्छा मात्र पाहिजे.हिमालयाच्या उतरणीवर होणारी जंगलतोड थांबविण्यासाठी तेथे कामगारांकडून “चिपको  आंदोलन”  उभारले गेले. शिक्षणसंस्थान कडून वृक्षसंर्वधनाचे उपक्रम हाती घेण्यासारखे आहेत. मोकळ्या तासात सांस्कृतिक कार्यक्रम साजर करताना ‘ एक मुल एक झाड ‘हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेऊन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची प्रथा पाडावी. झाड तोडण्या अगोदर झाड लावण्याची सक्ती असावी. ठिकठिकाणच्या महानगरपालिकांनी झाडे तोडण्याविरुद्ध कायदा केला पाहिजे. वृक्षारोपणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थान तर्फे मोफत रोपे हि पुरविली जातात.

कालमानाप्रमाणे व्रत वैकल्याचे स्वरूपही बदलत असते. वृक्षसंवर्धन हेच आजचे मोक्ष साधन आहे. काही वर्ष्या पूर्वी एका गृहस्थाने चातुर्मासाचे व्रत म्हणून रोज मुंबई ते पुणे प्रवासात माळरानावरबिया फेकल्या नंतर काही वर्ष्यांनी त्या माळरानाचे हिरव्यागार वृक्षराजीत रुपांतर झाले.

अनेक सामाजिक संस्था द्र्कश्राव्य माध्यमांद्वारे वृक्ष संवर्धनाच्या प्रचाराचे कार्य करीत आहेत. तसेच मार्ग अनेक आहेत पण ईच्छा असली पाहिजे. अश्या विविध मार्गांनी सर्वांनी प्रयत्न केले तरच आपली भारत भूमी.

“फ़ुल्ल कुसुमिता द्रुमद्ल शोभिनी”  या वर्णनानुसार पुन्हा शोभीवंत होवू लागेल.

trees are our friends

Like
Like Love Haha Wow Sad Angry
458165




, , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu