आजचे स्त्री – जीवन !




Like
Like Love Haha Wow Sad Angry
460122626

Stri Jivan, life of womenमहत्वाचे मुद्दे : पुरातन काळातील गार्गी, मैत्रेयी, कैकेयी यानसारख्या विद्या कलानिपुन स्त्रिया — आधुनिक जगातील समानतेची जाणीव — विविध स्त्री-मुक्ती संघटनाचे कार्य — सार्वजनिक क्षेत्रातील स्त्रियांचे कर्तुत्व व अष्टपैलूत्व — घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी — आजचे स्त्री – जीवन सुखी व समृद्ध होण्याची गरज.

* ‘ न स्त्री स्वातंत्र्यम् अहर्ति ‘ असे मनूने सांगितले आहे.पुराणकालीन सनातन, कर्मठ संस्कृतीमुळे स्त्रीचे स्वातंत्र्य लयाला गेले. आणि तिचे परावलंबित्व सुरु झाले. पुरातन काळात डोकावले तर तेव्हाची स्त्री ही वेदशास्त्र संपन्न आढळते. तिला शास्त्रांस्त्राचे शिक्षण दिले जात असे. गार्गी, मैत्रेयी यांसारख्या वेदशास्त्रनिपुण कैकेयीसारख्या युद्धशास्त्रात कुशल असणार्या स्त्रिया सर्व प्रकारच्या विद्याकलांत पारंगत होत्या.

*  आज भारतात मुलींना मोफत शिक्षण (Free education) दिले जाते. तिच्या साठी नौकरीत राखीव जागा ठेवल्या आहेत. संपत्तीचा वारशा हक्क तिलाही देण्यात आलेला आहे. समान वेतनाचा व समान नागरिकत्वाचा दर्जा देऊन सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यात आली आहे. ज्या कुटुंबात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव विकसित झालेली आहे. अश्या घरातील मुलींनाही स्वत:चे छंद, आरोग्य, ध्येय इत्यादी जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व तिचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

* स्त्रीच्या स्वत:च्या कार्य शक्तीला, बुद्धीला, आणि कर्तुत्वाला पूर्ण वाव मिळावा आणि समाजात स्त्रीला समान सामाजिक दर्जा मिळावा म्हणून स्त्री-मुक्ती चळवळ निर्माण झाली. विविध स्त्री-मुक्ती संघटनांच्या माध्यमाद्वारे समाजात आणि विशेषत: स्त्रियांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. यासाठी स्त्रियांना त्यांच्या हिताच्या कायद्यांचे ज्ञान व मदत दिली जात आहे. घटस्पोटीत, परित्यक्ता, विधवा आणि निराधार स्त्रियांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून आर्थिक मदत केली जात आहे. रोजगार मिळवून दिला जात आहे. ही मदत समाजातील सर्व थरांतील सर्व धर्माच्या स्त्रियांसाठी खुली आहे.

* आजची स्त्री हि डॉ, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, वा आमदार अश्या महत्वाच्या पदांवर काम करीत असली तरी ह्या कर्तबगारीपेक्षा ती घरकाम किती करते या वरून समाज तिचे मोठेपण व कर्तुत्व आजही ठरवितो. विवाहापूर्वी जोपासलेल्या कला, छंद, शिक्षण याकडे विवाहानंतर दुर्लक्ष केले जाते. संसारातील जबाबदार्यांमुळे वेळे अभावी विवाहापुर्वीची आष्टपैलू स्त्री विवाहानंतर केवळ चोवीस तासाची बांधील अशी चाकरमानी ठरते. संपूर्ण जबाबदारीचे एकटीवर पडणारे ओझे आणि सामाजिक दृष्टीकोन यांमुळे जबाबदारीची व मोठ्या अधिकाराची पदे बहुसंख्य स्त्रियांना कुवत व पात्रता असून सुद्धा नाकारावी लागतात. कारण त्या पदासाठी लागणारा वेळ त्या देवू शकत नाही. म्हणून विवाहा नंतर सुद्धा स्त्रीला स्वत:चे व्यक्तिमत्व विकसित करण्याजोगी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. आज काही प्रमाणात सार्वजनिक क्षेत्रात स्त्रियांच्या नैसर्गिक शक्तींना व गुणांना वाव मिळत आहे. पण अश्या स्त्रियांची संख्या खूप कमी आहे.

* आधुनिक समाजरचणनेमध्ये स्त्रीला घराबाहेर पडून पुरुष्याच्या बरोबरीने अर्थार्जन करणे अपरिहार्य झाले आहे. घरची व बाहेरची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागत असल्याने तिची तारे वरची कसरत चालू असते. याचा विचार शासकीय पातळीवर होवून स्त्रियांना बालसंगोपनास आवश्यक असणार्या प्रसूतीरजा, स्तनपानरजा, व अन्य सवलती देण्याचे कायदे झाले आहेत. कामाच्या ठिकाणी मुलांना सांभाळन्यासाठी पाळणाघरे,जेवणाच्या सोयी साठी झुणका-भाकर केंद्रे, भोजनगृहे, स्त्रियां साठी वसतीगृहे ईत्यादी सुविधा त्यांच्या साठी करण्यात आलेल्या आहे.

* आजकाल गृहोपयोगी साधने निर्माण झाली म्हणून स्त्रीला घरात जास्त काम नसते हे म्हणणे म्हणजे तिच्यावर अन्याय करणारे आहे. उलट या फावल्या वेळात गृहोपयोगी वस्तुंची खरेदी करणे,मुलांचे अभ्यास घेणे, त्यांना शाळेत पोचविणे व आणणे  घरचे हिशोब राखणे, यां सारखी अशी वेळखाऊ कामे तिच्याकडे आपोआपच आलेली आहे.त्यामुळे तिची ओढाथांब थांबलेली नाही.

* घरच्या कर्त्या पुरुष्यासह अन्य घटकांनी स्त्रीच्या बरोबरीने घरकामाची जबाबदारी उचलून तिला मदत करायला हवी. त्या दृष्टीने तिच्या व्यवसायात वा नोकरीत आवश्यक ते सहकार्य व प्रोत्साहन तिला द्यायला हवे.सर्व बाबतीत स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मोकळीक तिला दिल्यास खर्या अर्थाने समाजात स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल व त्यामुळे आजचे स्त्री-जीवन खर्या अर्थाने सुखी व समृद्ध होईल.

Today’s woman – life, lives and to increase awareness of the structural barriers that prevent women’s. Today’s working women are twice…

Like
Like Love Haha Wow Sad Angry
460122626




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu