ती…

Ti marathi prem kavita ती… ती म्हणजे कोण??? … ती म्हणजे, एके काळी मला पाहून लाजणारी,अन … गालातल्या गालात गोड हसणारी… नि आता, मला पाहून हि न पहिल्या सारख करणारी,अन माझ्या...

Ti marathi prem kavita

ti marathi kavita

ती…
ती म्हणजे कोण???
… ती म्हणजे,
एके काळी मला पाहून लाजणारी,अन
… गालातल्या गालात गोड हसणारी…

नि आता,
मला पाहून हि न पहिल्या सारख
करणारी,अन माझ्या समोरून निघून
जाणारी????…
ती…

ती म्हणजे,
एके काळी माझ्या फोनची वाट पाहणारी,
मी नाही केला तर स्वताहून फोन
करणारी…

नि  आता,
माझं नाव पाहताच,माझा फोने कट
करणारी????…
ती…

ती म्हणजे,
एके काळी माझ्याशी बोलताना,फक्त
माझ्याच कडे पाहणारी,
जर मी इथे तेथे पाहू लागलो,तर माझ्यावर
ओरडणारी…

नि आता,
मी बोलताना माझ्या कडे लक्ष हि न
देणारी,
अन मनात असूनही,माझ्याशी एक शब्द
हि न बोलणारी????…
ती…

ती म्हणजे,
एके काळी माझी सावली म्हणून
चालणारी…
नि आता,
माझ्या बरोबर नसणारी????…
ती…

ती म्हणजे,
एके काळी माझ्या वर जिवापार प्रेम
करणारी,
मलाच मित्र, नी मलाच सर्वस्व
मानणारी..

नि आता,
मी कोणी हि नाही तिझ्यासाठी,असं
वागणारी???…
ती…

ती म्हणजे,
आधी प्रियासी,
अन आता, मित्र हि नसणारी???…
ती…

ती म्हणजे कोण?
काहीच न कळणारी,
तरी हि आयुष्यात,
परत तिच हवी हवी शी वाटणारी…
तरी हि आयुष्यात,
परत तिच हवी हवी शी वाटणारी…
ती….
फक्त ती…. ♥♥♥

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3