डॉ बाबासाहेब आंबेडकर !

जन्म १४ एप्रिल १८ ९१,   महानिर्वाण ६ डिसेंबर १९५६

Essay on the biography of Dr. B.R Ambedkar

रत्नागिरी जिल्हा फणस, आंबा यांसारख्या  फळांच्या रत्नाचे आगर म्हणून प्रसिद्ध आहे. याच जिल्ह्याने लोकमान्य टिळक, साने गुरुजी यान सारख्या थोर नररत्नांना जन्म दिला. रत्नागिरी जवळ आंबवडे नावाचे खेडे आहे. तेथे रामजी सपकाळ नावाचा सरदारी बाण्याचा, जातीने माहार आचरणाने व विचाराने सुसंस्कृत असलेला इसम राहत होता वयाच्या अठराव्या वर्षी त्याने लष्करात प्रवेश केला. शिक्षणाची आवड असल्याने नोकरी बरोबर त्याचे शिक्षणही चालूच होते. लष्करातील मेजर मुरवाडकर यांची थोरली मुलगी भीमाबाई हि रामजीची बायको. भीमा बाई दिसण्यास सुरेख होती. स्पष्टवक्तेपणा मुळे तिचा सर्वांवर वचक होता. ** अश्या या रामजीचे आणि भिमाबाईचे दिवस आनंदात व मजेत चालले होते. रामजीचे बंधू म्हणजे भिमाबाईचे दीर हे संन्याशि होते. त्यांनी भीमा बाईला भविष्यवाणी केली होती कि तुला महान तेजस्वी मुलगा होईल.  सोमवार दिनांक १४ एप्रिल १८९१ सालची पहाट.अतिशय मंगल पहाट होती ! सूर्य-चंद्र ईत्यादी ग्रहांचा पवित्र मिलाप झाल्याचा तो दिवस होता. तो दिवस भाग्याचा व पुन्न्याचा समजला गेला.त्याच वेळी भीमा बाईला पुत्ररत्न झाले. बाराव्या दिवशी मुलाचे भीमराव असे नाव ठेवण्यात आले.

**  सन १८१४ मध्ये रामजी मेजर च्या हुद्यावर असताना लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते दापोलीस आले. भीमराव तेथील शाळेत जाऊ लागला. पण मुळात भिमाचा स्वभाव खोडकर असल्या मुळे त्याची भांडणे मिटविणे दिवसें दिवस त्यांना जड होऊ लागले. त्या मुळे तें सातार्यास राहण्यास आले.भिमाचा खोडकर स्वभाव जावा म्हणून त्याला क्यमप मध्ये टाकण्यात आले. सातार्याचे वातावरण भीमा बाई ना लाभदायक नव्हते. त्यांची तब्येत वारंवार बिघडत असे. त्यामुळे त्यांनी कायमचे अंथरून घरले. आणि लवकरच त्या मृत्यू पावल्या. त्यावेळी भीमराव अवघ्या सहा वर्षाचे होते.

**  इ.सन.१९०० मध्ये भीमराव साताराहायस्कूल मध्ये शिक्षणा साठी आले. ईंगरजी शाळेत प्रवेश झाल्याने भीमाला ती शाळा फारच आवडली. पण शाळेतील वातावरण ….? आपण शिकलेल्या क्य्म्प मधील व येथील शाळेत फार फरक आहे.  हे भीमाच्या चाणाक्ष मनाने ताबडतोब हेरले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईस आले भीमाने तेथे एल्फ़िन्सटन हायस्कुलात प्रवेश केला. जातीने अस्पृश्य असल्याने भीमाला ईच्छा असूनही संस्कृत चा अभ्यास करता आला नाही. पार्शियन भाषेत त्याचा नंबर असे. आनंदाची अभ्यासातील प्रगती बेताचीच असल्याने त्यास नोकरीला लावले. नंतर आनंद व भीमाची लग्ने केली. लग्नाचे वेळी भीमा चौदा वर्षाचा व व रमाबाई वर्षाची होती.

**  आपल्या मुलालाप्रखर बुद्धी मत्तेची दैवी देणगी लाभलेली आहे हे ओळखून रामजींनी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईस पाठविले. हिंदू समाजातील एका अडाणी व क्रूर रूढी मूळे त्या काळी अस्पृश्य गणल्या जाणाऱ्यां जातीत जन्मल्या मुळे शिक्षणात त्यांचा काहीजणांन कडून अपमान व्हायचा पण त्यातही त्यांच्यावर प्रेम करणार्या केळुसकर गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामूळे भीम उत्तम तऱ्हेने दहावी पास झाला. व बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून एल्फ़िन्स्टन कॉलेजात गेला. त्यांच्या चाळीत त्यांचा मोठा सत्कार केला.

** १९१२ साली ते बी.ए. झाले बडोद्याच्या महाराजांच्या ऋणातून अल्पसे मुक्त होण्यासाठी त्यानि त्यांचे कडे नोकरीचा अर्ज केला.त्यांना गायकवाडांकडे  नौकरी मिळाली. परंतु वडील आजारी असल्याची तार मिळताच ते मुंबईस निघाले. घरी गेल्यावर समजले मुलाचा चेहरा पाहण्यासाठी वडील आतुर झाले होते.त्यांचा चेहरा पाहताच वडीलांनी त्याच्या वरून प्रमाणे हात फिरविला व व त्या महान पुरुश्याने ह्या जगाचा निरोप घेतला.

**  त्यानंतर ते अमेरिकेत शिक्षणाकरीता गेले. तेथे एखाद्या तपस्व्या प्रमाणे दिवसाचे १८ तास ते अभ्यासात घालवु लागले.१९१५ साली ते एम. ए. झाले. त्या नंतर त्यांनी २, ३ विषयांवर प्रबंध लिहिले.या कष्टाचे फळ म्हनूण  १९२४ साली ते कोलम्बिया विद्यापीठाने त्यांना “डॉ ऑफ फ़िलॉसॊफ़ी” हि पदवी मिळाली. सरकारी कचेरीत त्यांना मोठ्या हुद्याची जागा मिळत नसे. हाता खालचे लोक देखील त्यांच्या टेबलावर दुरून फाईल टाकीत. मानी भीमरावांना हि वागणूक पसंत नसूनही त्यांचा स्वाभिमान दुखावला जात असे. म्हणून ते मुंबईला परतले. त्यांनी आपला धीर खचू दिला नाही.तरीही खटपट करूनही त्यांनी सिडेनह्यम कॉलेज मध्ये प्राध्यापकाची जागा मिळविली. पैसा जमविला व १९२० साली उरलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा लंडन ला रवाना झाले. तेथे त्यांनी निरनिराळ्या ग्रंथालयात पुस्तके वाचून आणि त्याच बरोबर आभ्यास हि चालू ठेवला. याचे फळ म्हणून त्यांना १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने “डॉ ऑफ सायन्स” हि पदवी दिली.

** अस्पृश्य समाजा साठी स्व: काहीतरी करावे असे त्यांना मनापासून वाटे. यामुळे त्यांच्यात एक प्रकारे चैतन्य निर्माण होई.व त्यांनी पाउल पुढे टाकले.पहिली सुरवात म्हणजे त्यांनी १९२० साली त्यांनी सुरु केलेले पाक्षिक पत्र  ‘मूकनायक’ हेच होय. त्यानंतर त्यांनी महाडच्या तळ्यातील सर्वांसाठीच म्हणजे अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते. पाणी हेच जीवन  त्यांच्या पासून हिरावल्या जाते,या साठी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. मार्च १९२७ रोजी सत्याग्रही तळ्याकडे निघाले.माणुसकीचे हक्क व निसर्गाची देणगी हे पाणी मिळवायचेच ईतक्यासाठी आंबेडकर पुढे होऊन सत्याग्रह सुरु झाला. अस्पृश्य म्हणून ज्यांनी मुंबईच्या कॉलेजात पाण्यासाठी हाल सोसलेत, बडोद्याच्या हॉटेल मध्ये ज्यांनी मार खाल्ला ते आंबेडकर खरोखरच सत्याग्रहींचे सेनापती शोभत होते.

पाण्याचा घोट घेऊन त्यांनी ईतरान्ना पाणी पिण्याची मोकळीक दिली.पुढे पुढे त्यांच्या कार्याची प्रगती होऊ लागली.
** पाच वर्षे झगडत राहिल्याने १९३५ साली नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळाला. याच काळात त्यांनी “बहिष्कृत भारत” नावाचे नियतकालिक सुरु केले. ** आपल्या भारत देश्यात इंग्रजांचे राज्य होते.१५ ऑगष्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्या नंतर भारतातल्या लोकांना विशिष्ट पद्धतीने राज्य कारभार करता यावाया साठी भारताची स्वतंत्र राज्य घटना असणे आवश्यक झाले.त्या दृशीने भारतीय विद्वानांची एक तज्ञ समिती निर्माण करण्यात आली.त्यामध्ये ते प्रमुख होते. त्यांची कायदा मंत्री म्हणून निवड झाली.त्यावेळी घटना लिहिण्याचे काम त्यांच्या कडे देण्यात आले.त्यांनी अहोरात्र कष्ट करून आपल्या अंगी असलेली बुद्धिमत्ता प्राणपणाला लावली १९४८ च्या फ़ेब्रुआरित घटना लिहून पूर्ण केली. त्यामुळे त्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून संबोधन्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ पास करून घेतले. अस्पृष्यान साठी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय, व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय  काढलेत.

** “पिकते तेथे विकत नाही” आपल्या जवळ असलेल्या माणसाचे गुण आपण जाणू शकत नाही.दूरच्या माणसाला त्याची परख होते. म्हणून १जून १९५२ रोजी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने ‘ डॉ ऑफ लों ‘ हि पदवी देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी  स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकषाही तत्वाचा पुरस्कार करणारे अनेक ग्रंथ लिहिले, भाषणे दिली. आणि आपली द्लीतांबद्दलची भूमिका स्पष्ट केली. शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण या सर्वांमध्ये त्यांनी आपले स्वतंत्र तर्कशुद्ध विचार मांडून दाखविले. दलित समाजात जागृती निर्माण झाली तेव्हा त्यांना ज्ञानाचे महत्व पटले.आजही त्यांच्या नावाने कितीतरी कार्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे कार्यरत आहेत.

** त्यांचा हिंदू धर्मातील पाखंडी संतांना विरोध होता. भारत देश्यावर त्यांचे अलोट प्रेम होते. त्यामुळे हिंदू धर्मातून पर धर्मात जाण्याचा विचार करतानाहि भारतातच उगम पावलेल्या आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. नागपुरात त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत १४ आक्टोंबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांचे सर्व आयुष्य कष्टात गेले. जातीने अस्पृश्य असल्याने लहानपणी लोकांकडून त्यांची हेटाळणी झाली. त्यातून मार्ग काढण्या साठी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. व मोठेही झाले त्यामानाने त्यांना हवी असलेली समानतेची वागणूक मिळेना! ती मिळण्या साठी त्यांना अनेक गोष्टीन सोबत झगडावे लागले.  अनेक गोष्टीना तोंड द्यावे लागले. पैश्याच्या अडचणी तून मार्ग काढावे लागले. त्यासाठी त्यांनी उन्हातान्हाची पर्वा न करता अतोनात कष्ट केले. त्यामध्ये साहजिकच त्यांची प्रकृती ढासळत गेली. आणि रक्तदाब, मधुमेह, या रोगाने त्यांचे शरीर थकले.

**   दलित समाजा साठी अविरत कार्य करणारा आणि शिका, संघटीत व्हा, व संघर्ष करा, असा मुलमंत्र देणारा हा मांनव धम्माचा उपासक आपल्या कर्तुत्वाच्या स्मृती मागे ठेवून ६ डिसेंबर १९५६ रोजी या विश्वाला सोडून गेला. मरणोत्तर त्यांना “भारत रत्न” हा किताब भारत सरकारने बहाल केला. अश्या या थोर पुरुष्याला आमच्या सर्वांचे कोटी कोटी विनम्र अभिवादन !!!

Free Essays on Dr Babasaheb Ambedkar

Source : Marathi Unlimited